kinwat today news

किनवट:  वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट यांनी वनरक्षकला केली थापड बुक्क्यांनी मारहाण

किनवट टुडे न्युज:    वन रक्षकाने एक सागवान भरलेला ऑटो धरून कार्यालयात आल्यानंतर त्या कार्यालयातील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चोरट्या सागवानाचा ॲटो पकडून आणणाऱ्या आपल्याच कर्मचाऱ्याला थापट बुक्क्यांनी मारहाण करून घाणेरड्या शिवीगाळ केल्याचा प्रकार किनवट येथे घडला आहे. दिनांक 28 रोजी घडलेल्या या घटने संदर्भाने किनवट पोलीस ठाण्यात फक्त अर्ज घेतला आहे.

     किनवट तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील वनरक्षक सिद्धार्थ मिलिंद वैद्य यांनी 28 मे रोजी पोलीस ठाणे किनवट येथे दिलेल्या अर्जानुसार या दिवशी सकाळी 6 वाजता चिखली गावातुन किनवट कडे येत असताना एका ऑटो मध्ये कट साइज केलेले सागवान दिसले. त्या आटो चा पाठलाग करून त्यांनी ठाकरे चौक गोकुंदा येथे पकडला. त्यावेळेस त्याच्यासोबत बाबू गुळवे हे होते. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन लावला होता पण संपर्क झाला नाही. ऑटो मधील रिक्षाचालक शेख शमी शेख अनवत व इतर दोघे ऑटो सोडून पळून गेले. त्यानंतर सिद्धार्थ वैद्य याने तो ऑटो  वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला आणि त्याचा प्रथम गुन्हा अहवाल क्रमांक 12/ 2020 लिहला. या संदर्भाचा राग मनात धरून वनपरिक्षेत्र अधिकारी कंधारे यांनी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या समक्ष मला थापड बुक्क्यांनी मारहाण करीत मला खाली पाडले आणि माझ्या हातातील प्रथम गुन्हा अहवाल पी ओ आर घेतले. त्यावेळी पी ओ आर फाटले आहे. सोबतच कंधारे यांनी मला  भरपूर अश्शील शिवीगाळ केली आणि माझा अपमान केला आहे.              याप्रसंगी ड्रायव्हर आवळे वनपाल के.जी. गायकवाड
व बाबू गुळवे हे हजर होते. मला मारहाण करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती  अर्जात केली आहे. किनवट पोलीस ठाण्यात हा अर्ज घेतला असून अर्जाच्या ओ सी वर पी एस ओ ची स्वाक्षरी आहे.31 मे ची सायंकाळ होईपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply