kinwat today news

नागरिकांच्या समुपदेशासाठी सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना मानसिक आधार देवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सिडको नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या परिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठया मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. ही गरज लक्षात कोव्हिड आजाराबाबत समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देण्याची जबाबदारी सहयोगी प्राध्यापकांना दिली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दितील विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर), जोशी गल्ली (सराफा होळी परिसर), शिवाजीनगर या क्षेत्रात कोव्हिड 19 रुग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून या कंटेनमेंट झोन मध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून

या झोनमध्ये सहयोगी प्राध्यापक दिवसातून वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांना धीर देवून अडचणीची माहिती घेतील. या अडचणी अपर जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने त्या दूर करण्याची कार्यवाही करतील.

समुपदेशनासाठी महानगरपालिका हद्दीतील विवेकनगर येथे डॉ. एस. व्ही. जगताप, इतवारा- डॉ. ए. टी. शिंदे, मिल्लतनगर- डॉ. एफ. एम. सौदागर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर)- डॉ. एस. एस. पाईकराव, जोशी गल्ली (सराफा, होळी परिसर)- डॉ. एन. के. वाघमारे, शिवाजीनगर- डॉ. श्रीमती के. बी. गित्ते यांची नेमणुक करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या आदेशात देण्यात आलेल्या अटी व शर्ती जशास-तशा लागू राहतील. जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “नागरिकांच्या समुपदेशासाठी सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती

 1. Hey just wanted to give you a quick heads up. The text
  in your article seem to be running off the screen in Opera.
  I’m not sure if this is a formatting issue or something to do with internet browser compatibility but
  I thought I’d post to let you know. The design look great though!
  Hope you get the issue fixed soon. Many thanks

Leave a Reply