किनवट येथे नगरपालिका च्या वतीने किनवट कार्ट या  होमडिलीवरी मोबाईल ॲप लोकार्पण सोहळा

किनवट: व्यापारी व ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डरची सुविधा उपलब्ध होणे हे आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर अनिवार्य अशी सुविधा आहे.या सॉफ्टवेअरचा उपयोग नागरिकांनी करावा. किनवट नगरपरिषदेने या तंत्रज्ञानाच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली आहे.ग्राहकांनी याचा आवश्यक लाभ घेण्याचे आव्हान आमदार भीमराव केराम यांनी केले.
दिनांक 29 मे रोजी किनवट नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘किनवट कार्ट’ ह्या ऑनलाइन होम डिलिव्हरी शॉपिंग कार्टचे लोकार्पण प्रसंगी आमदार भीमराव केराम बोलत होते .यावेळी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपजिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्याधिकारी निलेश सुंकावार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार नाईक, व्यापारी असोसिएशनचे दिनकर चडावार हे उपस्थित होते. किनवट नगरपरिषदेच्या वतीने व्यापारी व ग्राहकांच्या सुविधासाठी किनवट या ठिकाणी अँड्रॉइड ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. खासदार हेमंत पाटील यांची याप्रसंगी उपस्थित होती.उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे. याप्रसंगी अनिल तिरमनवार, मारुती भरकड, बालाजी पावडे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिराणी, माजी नगराध्यक्ष साजिद खान, बाबूराव औदिवार, फिरोज तवर, नरेश तिरमनवार, मधुकर माहूरकर आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.