kinwat today news

नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्याशिवाय जिनींग बंद करू नका – खासदार हेमंत पाटील

किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्याशिवाय जिनींग आणि सीसीआय केंद्र बंद करू करण्यात येऊ नये अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे केली आहे .
कोरोनामुळे मागील जगभर लॉक डाऊन घोषित केल्यामुळे दोन महिन्यापासून सर्व बाजारपेठा आणि शेतमाल खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आलयामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला रब्बी हंगामातील शेतमाल शेतात पडून होता हळूहळू लॉक डाऊन मध्ये शिथिलता आणल्यामुळे काही प्रमाणात शेतमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते . हिंगोली ,नांदेड , यवतमाळ या हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कापूस पिकविला जातो त्यामुळे मतदार संघात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील केली होती त्यानुसार वसमत , किनवट आणि नांदेड जिल्हयात्तील कहाणी भागात सीसीआय केंद्र खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले होते .याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे शेतकऱ्यानी नोंदणी केली आहे पण मतदार संघातील काही भागातून सीसीआय केंद्र ,जिनींग बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकरी हित समोर ठेवून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे अशी मागणी केली आहे कि, लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाले असून मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्याशिवाय मतदार संघातील एकही सीसीआय केंद्र आणि जिनींग बंद करण्यात येऊ नये . मतदार संघातील वसमत आणि किनवट या ठिकाणीच्या सीसीआय केंद्रावर तब्ब्ल ५ हजारच्या वर शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ५० हजार क्विंटलच्या वर कापसाची आवक होईल आणि अजूनही या केंद्राबाहेर दोन किलोमीटर पर्यंत कापसाने भरलेल्या गाड्यांच्या रांगा लाग; लागल्या आहेत तीन तीन दिवस शेतकरी कापूस खरेदी केंद्राबाहेर थांबुन आहेत त्यामुळे शेतकरी हित लक्षात घेऊन या गांभीर्याने विचार करण्यात यावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः याठिकाणी भेटी देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अडीअडचणी जाणून घेतल्या व जिल्हा निबंधक आणि जिनींग मालकांना सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी काही सूचना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply