शिवशक्तीनगर ( घोगरवाडी ) रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार -सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) :
” शिवशक्तीनगर – ( घोगरवाडी ) येथील गरोदर मातेस प्रसुतीसाठी रुग्णालयात जाण्याकरिता बैलगाडीचा आधार घ्यावा लागला ” या वृत्ताची दखल घेत संबंधित सर्व विभागाची बैठक घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सदरील गावच्या रस्त्याचा मार्ग मोकळा केला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , शिवशक्तीनगर- ( घोगरवाडी ) येथे प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका महिलेस दि . २६/०५/२०२० रोजी प्रसुती वेदना सुरु झाल्याचा प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी ( बु . ) येथे सकाळी ७.०० वा . भ्रमणध्वनीद्वारे संदेश आल्याने शिवशक्तीनगर – ( घोगरवाडी ) येथे रुग्णवाहीका सकाळी ८.०० वाजता पोहचली . परंतु १ कि.मी. अंतर पक्या रस्त्याअभावी रुग्णवाहीका महिलेच्या घरापर्यंत जाऊ शकत नव्हती . त्यामुळे बैलगाडीने गरोदर मातेस रुणवाहीकेपर्यंत आणण्यात आले . त्यावेळी आरोग्य कर्मचारी तिथे हजर होते . त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्रविष्ठ केले . तिथे दि .२७ / ०५ / २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता स्वाभाविक प्रसुती झाली असुन ३ कि.ग्रॅ . वजनाचे बालक जन्मास आले . माता व बालक यांची प्रकृती चांगली आहे . याअनुषंगाने आलेल्या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी दि .२९ / ०५ / २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आपल्या दालनात सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली . आरोग्य , वन व बांधकाम विभागाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या . आदिवासी विकास विभागामार्फत पाच रुग्णवाहीका , औषधी , प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र इमारत बांधकाम व दुरुस्ती आणि रस्ते विकासासाठी भरपुर निधी देण्यात आला आहे . तेव्हा या निधीचा पुरेपुर विनियोग करुन अतिदुर्गम वाडी – वस्ती , कोलामपोड पर्यंत आरोग्यासह सर्व सोयी – सुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्या . असे त्यांनी सांगितले .उपस्थित सर्व यंत्रणांनी तातडीने याची दखल घेऊन प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करण्याची ग्वाही दिल्याने सदरील गावच्या रस्त्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.