kinwat today news

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी समाजमाध्यम फेसबुक वरून केली राजकीय निवृत्ती जाहीर!

नांदेड: (आनंद भालेराव) माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी समाजमाध्यम फेसबुक वरून राजकीय निवृत्ती जाहीर केली असली तरी अनेक चाहत्यानी राजकीय निवृत्तीबद्दल फेरविचार करण्याची विनंती कॉमेंट्स द्वारे व फोनवरून केली आहे.

ताईने आपल्या फेसबुक अकाऊंट वरून एक पोस्ट मध्ये लिहले आहे की,आता थांबावे असे वाटत नाही । ना किसींसे दोस्ती ना किसींसे बैर; खूप प्रेम मिळाले जळणारे होते पण प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे एक सामाजिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीला मिळायला हवे
43 वर्ष राजकारणात होते एखाध्या राजकुमारी सारखी राहिले 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटा त नेसली मिळालेले काम मन लावून केले.आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा सगळ्यांनीच प्रेम दिले सन्मान दिला काहीच तक्रार
नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते रागात घेतलेले निर्णय असेच असतात ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येते नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत हे पक्के समजलंय त्या मुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे. एकटीने सगळे लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही.ज्यांच्यासाठी काम केले त्यानी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत.
आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे.पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला.
जेव्हा लिहायचे तेवा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थाम्बवीत आहे.
या पुढे नव्या पिढीसाठी काम करील घरी बसणार नाही.बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थाम्बवीत आहे । सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार ।मी आहे कधीही या घर आणि मी तुमचीच आहे ।नमस्कार सगळ्यांना थाम्बते.

* अनेकांना वाटतंय आपण राजकीय सन्यास घेऊ नये.
“आता थांबावसे वाटत नाही” अशा प्रकारच्या वाक्याची सुरुवातच सर्वकाही बोलून जाते.कारण आपण निस्वार्थी कर्तृत्वावर आपल्या निस्वार्थी समाजसेवे वर,आपल्या अन्यायाच्या विरुद्ध फोडणाऱ्या डरकालीवर लाखो तरुण,तरुणी व सामान्य जनता आपल्या सोबत आपोआप जोडल्या गेली.आपण राजकारणात राहूनही राजकारण केलं नाही.कारण आपला जन्मच समाजकारण करणाऱ्यांच्या घरी म्हणजेच देशासाठी हुतात्मा झालेल्या जयवंतराव पाटील वायफनेकर यांच्या पोटी झाला आहे.स्वार्थी राजकारण्यात राहून निस्वार्थी देशाची सेवा केली.
जमाना बदलत गेला. पैशाला महत्त्व आले.आणि आपल्या समोरची बांडगूळ आपल्या पेक्षा दोन नंबर च्या जोरावर धनवान बनली .आपली निवडून येण्याची लायकी असतानाही आपली तिकिटे कापल्या गेली.
आपणच दुसर्यांना तिकिटे देणाऱ्या दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघावे लागले.हा मनसंताप जनतेलाही झालाच.
परंतु तुम्ही सुर्यकांता आहात तुमच्यात सूर्याचे तेज अजूनही कायम आहे.आणि सारखी लहान सहन लाखो कार्यकर्ते आजही आपल्या सोबत आहेत. तुमच्या सारख्यां निस्वार्थी ताईची सदा जनतेला गरज आहे.आपण अचानक घेतलेला निर्णय जनता बुचकळ्यात पडली आहे.आपण आपल्या राजकिय निवृत्ती च्या निर्णयावर फेरविचार करावा असे अनेकांनी आपल्या कॉमेंट्स द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

*माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर—- अरे वा, मनाला वाटले आणि राजकारणात आले आणि मनाला वाटले कि राजकारण सोडले हे बरोबर नाही. राजकारण म्हणजे निव्वळ सत्ताकारण नव्हे हे माझ्यासारख्या तुमच्या पेक्षा ज्यूनीयरने सांगावे असे नाही पण सांगु धजतो. राजकारण हे गतीने समाजकारणच करता यावे साठी लागणारी प्रशासकीय ताकद आपल्या पाठीशी ऊभी राहावी ह्या साठी असते. आज बदलत्या परिस्थितीत ती आपल्या आवाक्यात येत नसेल तेंव्हा संयमाचा बांध बाधंयचा असतो व आपले समाजकारण आपल्या विवेकाने पुढे पुढे न्यावयाचे असते. तुमचा नाव लौकिक ज्या धैर्यशिलतेने आणि निस्वार्थ सेवे मुळे झाला त्या नाव लौकिकास जागावेच लागेल.असे एकतर्फी निवृत्ती तुम्हास जाहिर करता येणार नाही आणि तो लोकद्रोह असेल हे जाणावे. ज्या तुमच्या प्रामाणिक साथीदारांनी आजवरच्या राजकिय प्रवासात निस्वार्थपणे साथ दिली त्यांचेशि विचार विनिमय व सार्वजनिक सहमतीने निवृत्ती आपण एखादे वेळेस घेऊ शकता पण तो न करता तसा निर्णय घेणे ही त्यांची प्रतारणा केल्या सारखे होईल. आपणास नम्रपणे विनंती कि आपण हा निर्णय विना विलंब मागे घ्यावा. वाटल्यास सर्व सहका-यांशी चर्चा करून आपण सहमतीने निवृत्तीचे निर्णय घेऊ शकता.

*भागवत देवसरकर – सूर्यकांताताई …..
तुमच्यासारख्या राजकारणी सध्या शोधुन सुद्धा सापडणार नाही, त्यामुळे आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे.
आपण पण आपल्या पदाच्या माध्यमातून हदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात खूप मोठा विकास केला आपल्या नंतर एकाही राजकारणाने एवढा काम तालुक्यात केलं नाही.. तालुक्याला आपली गरज आहे .
पुन्हा जोमाने राजकारणात उतरून आपण गरुड झेप घ्यावी अशी आमची इच्छा आहे त्यामुळे ताई आपण राजकारणा मधून निवृत्तीचा विचार सोडून जनतेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करावी…

*गोविंद कारवा – सूर्यकांता पाटील या नावाला कोणत्याच पक्षाची गरज नाही. हा एक विचार आहे. आपल्या विचारांची मात्र राजकीय पक्षाला निश्चितच गरज आहे. जातीपातीच्या भिंतीत गुंतलेल्या राजकारणापासून आपण दूर जरूर जाल. पण समाजकारणाचा किडा आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आपण समाजाचे काही देणे लागतो, हे आपण नेहमी म्हणत असता..आज तेच मी आपल्याला आठवण करून देत आहे. राजकीय निवृत्ती हा काही फार मोठा निर्णय नाही. पण आपल्या वैचारिक व्यासपीठाची कमतरता भासू नये, असा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून पुन्हा..पुन्हा..आणि पुन्हा हात जोडून विनंती की, आपण कोणत्याही पक्षात राहा..पण राजकारणात सक्रिय राहा..देश आणि राज्यातील अनेक मोठी पदे आपल्या पायाशी लोळण घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला पदाची अपेक्षा नाही. पण ज्या पक्षात आपला सन्मान होईल, अशा पक्षात आपण राहावे, अशी नम्र विनंतीवजा अपेक्षा व्यक्त करतो.
– आपलाच,गोविंद
अशा भावना अनेकांनी कॉमेंट्स द्वारे कळविल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply