kinwat today news

माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ

जिवती: (26 मे) (प्रा.सुग्रीव गोतावळे) तालुक्यात कोरोना विषाणूच्या उपाययोजने साठी सर्व विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत.त्यामुळे वाळू तस्करांनी वाळूचोरिला सुरुवात केली आहे.कर्मचारी व्यस्त असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सध्या वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. त्यांनी महसूल, वन विभाग यांच्या हद्दीतील वाळू चोरणे सुरू केले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही दिवसापासून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे वनविभाग व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले तेव्हापासून जिल्ह्यात कोरोना उपाययोजनां साठी विविध विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. प्रारंभी चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता मे महिन्यापासून जिल्ह्यात पॉझिटिव्ह मोठ्याप्रमाणात सापडले आहेत. सध्या त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना करण्यातच विविध विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत .त्यामुळे आता वाळूतस्करांनी नदी नाल्याकडेमोर्चा वळवला आहे. जिवती वनविभागाच्या हद्दीत असलेल्या नाल्यात चांगल्या दर्जाची वाळून मिळते या वाळूला जिल्ह्यात मागणी आहे. त्यामुळे सध्या वाळूतस्करांनी नाल्या कडे मोर्चा वळवला आहे. रात्री मोठ्या प्रमाणावर नाल्यातून वाळूची तस्करी केली जात आहे .जेथे जागा मिळेल तेथे वाळूची साठवण केली जात आहे त्यानंतर त्याची उचल करून विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे चांगलेच फावत चालले आहे

घरकुलाची कामे थांबली
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घरकुलाची कामे मंजूर आहेत. जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक घरकुलांची कामे ठप्प पडली आहेत. दरम्यान घाटाचे लिलाव करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ

 1. We stumbled over here coming from a different web page and
  thought I might check things out. I like what I see so now i’m following you.

  Look forward to finding out about your web page for a second time.

 2. Greetings from Florida! I’m bored at work so I decided
  to check out your website on my iphone during lunch break.
  I enjoy the information you provide here and can’t wait to
  take a look when I get home. I’m amazed at how quick your blog loaded
  on my mobile .. I’m not even using WIFI, just 3G ..

  Anyways, great blog! adreamoftrains best web hosting
  sites

Leave a Reply