kinwat today news

जगातील सर्वोच्च तापमानाच्या ‘टॉप टेन’मध्ये विदर्भातील तीन शहरे! – अकोला, नागपूर आणि चंद्रपूर

चंद्रपूर, दि.२६:(प्रा.सुग्रीव गोतावळे) मागील २४ तासात जगामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील तीन शहरांची नोंद झाली आहे. अकोला, नागपूर विमानतळाचे सोनेगाव आणि चंद्रपूर अशी या तीन शहरांची नावे आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यातील तापमानाने कहर गाठला आहे. जगात हवामानाची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावर सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या १५ शहरांमध्ये भारतातील ९ आणि पाकिस्तानातील ५ आणि दक्षिण आफ्रिकेतील एका ठिकाणांची नोंद केली आहे.

भारतातील नऊ शहरांमध्ये राजस्थानातील चार, महाराष्ट्रातील विदर्भाची तीन तसेच उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे.

राजस्थानातील चुरू (४७.५ अंश सेल्सिअस) जगात दुसऱ्या व देशात पहिल्या क्रमांकाचे तापमान नोंदवल्या गेले. त्यापाठोपाठ विदर्भातील अकोला येथे जगात तिसऱ्या क्रमांकाचे ४७.४ अंश सेल्सिअस तापमान होते. पाचव्या क्रमांकावर नागपूर सोनेगाव (४७.०), सहाव्या क्रमांकावर राजस्थानच्या गंगानगर (४६.९), सातव्या क्रमांकावर राजस्थानातील बिकानेर आणि विदर्भातील चंद्रपूर (४६.८), आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील बांदा आणि मध्यप्रदेशातील खजुराहो (४६.६) तसेच नवव्या क्रमांकावर राजस्थानातील कोटा (४६.५) असा जागतिक उच्चांकी तापमानाचा क्रम आहे. सोमवारी नांदेड शहराचे तापमान ४५.६ पर्यंत पोहचले होते. वर्षभरातील हे सर्वाधिक तापमान असले तरी दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता पुढील दोन आठवडे तापमान वाढत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply