रुग्णालयात 63 रुग्णांवर उपचार सुरु ; कोरोनाचे नवीन 6 रुग्ण पॉझिटिव्ह एकुण रुग्णसंख्या 133 तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोना विषाणु संदर्भात नांदेड जिल्ह्याची सोमवार 25 मे 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतची माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी पुढीलप्रमाणे दिली आहे. सोमवार 25 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 96 अहवालापैकी 84 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन 6 रुग्णांचे स्वॅंब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 133 झाली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे 1 पुरुष (वय 55 वर्षे) रुग्ण मिल्लतनगर येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मृत्यू संख्या ही 7 झाली आहे.

सोमवार 25 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ईतवारा भागातील 2 रुग्ण (2 पुरुष वय 27, 32 वर्षे) व आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 80 वर्षे), मिल्लतनगर येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 55 वर्षे), वडसा ता. माहुर येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 17 वर्षे) व दहेलीतांडा ता. किनवट येथील 1 रुग्ण (1 रुग्ण वय 29 वर्षे) या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे.

सोमवार 25 मे 2020 रोजी एनआरआय यात्री निवास कोवीड सेंटर येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 133 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 63 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 63 रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील 1 स्त्री रुग्ण वय 55 वर्षे यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

सोमवार 25 मे 2020 कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती

सर्वेक्षण 1 लाख 33 हजार 733, घेतलेले स्वॅंब 3 हजार 339, निगेटीव्ह स्वॅंब 2 हजार 830, सोमवार 25 मे रोजी पॉझिटीव्ह स्वॅंब संख्या 6, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 133, स्वॅंब तपासणी अनिर्णीत संख्या 128, स्वॅंब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यु संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 63, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 63, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 288 एवढी आहे.

रविवार 24 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 145 स्वॅंब तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व 25 मे 2020 रोजी 143 रुग्णांचा स्वॅंब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील.

एकूण 133 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर 63 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 63 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 45 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहुर येथे 1 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भीत करण्यात आले असून इतर सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदर अॅप सतर्क करण्यास मदत करेल, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ ईश्वरराव भोसीकर यांनी केले आहे.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.