kinwat today news

आदिवासी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील 5 डॉक्टरांचे व 4 चतुर्थी कर्मचाऱ्यांचे डेपोटेशन (प्रतिनियुक्ती) झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकातून रोष.

किनवट ता.प्रतिनिधी: सर्व स्तरात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला असताना पेसा कायद्याचे नियम पायदळी तुडवत, आदिवासी नक्षलग्रस्त, अतिदुर्गम भाग म्हणून शासनाच्या दरबारी नोंद असलेल्या किनवट तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील पाच डॉक्टरांचे व चार चतुर्थी कर्मचाऱ्यांचे डेपोटेशन (प्रतिनियुक्ती) काही दिवसापूर्वी झाली आहे. प्रतिनियुक्ती झालेले वैद्यकीय अधिकारी 1)डाॅ. प्रदिप स्वामी हदगाव उप जिल्हा रुग्णालय 2) डाॅ. भुरके ग्रामीण रूग्णालय हिमायतनगर 3) डाॅ. मुंगळकर उप जिल्हा रुग्णालय मुखेड हे प्रतिनियुक्ती झालेल्या ठिकाणी कामावसर आहेत तर प्रतिनियुक्ती झालेली आहे पण ज्यांना आध्याप त्यांना सोडले नाही असे वैद्यकीय अधिकारी 1)डाॅ राजकुमार बोडखे
ग्रामीण रूग्णालय माहूर 2) डाॅ तोटवाड उप जिल्हा रुग्णालय मालेगाव जि नाशिक हे आहेत.तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनियुक्ती
1) जयश्री अमरसिंग डुलगज नांदेड
2) श्री शेंडे ग्रामीण रूग्णालय माहूर
3)श्री गायकवाड ग्रामीण रूग्णालय बिलोली
4) श्री जयसिंग अमरसिंग डुलगज
ग्रामीण रूग्णालय मुदखेड या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत.असे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी की किनवट टुडे न्युज शी बोलताना सांगितले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकातून रोष व्यक्त होत आहे.
किनवट पासून जवळच असलेल्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आधीच डॉक्टरांची संख्या कमी असताना तसेच या भागात नोकरी करण्यास कोणी धजत नसताना येथे कार्यरत असलेल्या पाच डॉक्टरांची व चार चतुर्थी कर्मचाऱ्यांची (प्रतिनियुक्ती) इतरत्र केली जाते. किनवट तालुका आदिवासी दुर्गम असल्यामुळे या भागात आलेले डॉक्टर, कर्मचारी जास्त वेळ टिकाव धरत नसून लवकरच आपल्या आपल्या सोयीनुसार प्रतिनियुक्ती करून घेत असतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. असे असताना कोरोना महामारी पार्श्वभूमीवर तसेच पैसा कायद्याचे नियम धुडकावून आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रतीनियुक्ती केली आहे. पेसा कायद्याचे उल्लंघन करून अशी या कोरोना महामारी काळात प्रतिनियुक्ति का केली गेली ? हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. तसेच या ठिकाणी चे लोकप्रतिनिधी यावर काय निर्णय (ऍक्शन) घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply