kinwat today news

दिशा एज्युकेशन व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, इस्लामपूर च्या वतीने सांगली येथील काळी खाण जवळील वारांगनां(वेश्या) वस्ती मध्ये प्रा.डॉ. विशाल आर. जाधव यांच्या हस्ते १५० महिलांना SANITIZER बॉटल्स चे वाटप

इस्लामपूर: काल दि. 23 मे रोजी,दिशा एज्युकेशन व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, इस्लामपूर च्या वतीने सांगली येथील काळी खाण जवळील वारांगनां ( वेश्या ) वस्ती मध्ये संस्थेचे संस्थापक** *अध्यक्ष तथा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्रा.डॉ. विशाल आर. जाधव यांच्या हस्ते १५० महिलांना SANITIZER बॉटल्स चे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले वारांगनां करिता शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यांना इथून पुढे चार महिने पुरेल एवढी शिदा उपलब्ध करुन द्यावी. तसेच आवश्यक त्या वस्तू देखील पुरविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देखील बसपाच्या वतीने डॉ. जाधव यांनी 21 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आले आहे. तसेच एक कार्यक्षम महिला आमदार म्हणून आ. प्रणिती शिंदे यांना देखील सदर निवेदन दिले आहे. लवकरच त्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी सतत पाठपुरावा चालू राहिल.व समाजातील* *दानशूर व्यक्तींनी देखील काही मदत यांच्या पर्यंत पोहचवावी असे प्रतिपादन डॉ. विशाल जाधव यांनी केले.*
*समवेत सामाजिक कार्यकर्ते मा.विशाल कदम उपस्थित होते. तसेच बहुजन रयत पार्टिचे महासचिव मा.हेमंत मोहिते, खजिनदार सौ.वनिता सकटे आदि उपस्थित राहून, ज्या प्रकारे या महिलांचे हाल चालले आहे या बद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली.*.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply