kinwat today news

किनवट वन क्षेत्रातील कामाच्या चौकशी ची मागणी

किनवट: तालुक्यातील धामदरी. वडोली, लोणी परिसरात झालेले पाणलोट(प्लॅनटेशन) रोप लागवड ,वन विकास कामात अनागोंदी केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या प्रकारची चौकशी करावी अशा आशयाचे लेखी तक्रार मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांना मुस्लिम लीग पक्षाचे तालुकाध्यक्ष एस इम्रान आली केली आहे. किनवट वनपरिक्षेत्र विभाग या ना त्या कारणाने सदा चर्चेत असते सागवानाची तस्करी, वन्यपशू चे मानवावर हल्ले तसेच शासकीय विकास कामामध्ये पैशाची अफरातफर. असाच एक प्रकार किनवट वन विभागाअंतर्गत येणाऱ्या अंबाडी बीट मधील परिसरात झालेल्या सण 2018/19 या आर्थिक वर्षात वनतळे, जलयुक्त शिवार ची कामे व रोप लागवड मध्ये शासकीय अंदाज पत्रकानुसार कामे न करता नियम व अटी ना तिलांजली देण्यात आली आहे.कामाची चौकशी करून त्याला जबाबदार अधिकारी आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करून शासनाचे झालेले नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी अशी मागणी मुस्लिम लीग पक्षाचे तालुका अध्यक्ष इम्रान अली यांनी केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply