kinwat today news

आताची ताजी बातमी:काय सुरू नी काय बंद!-जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित निर्देश.

नांदेड: आज नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश काढले आहेत.शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. कापड, चप्पल-बूट, ज्वेलर्स हाताळण्यावर मर्यादा असतील.

सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९ ते ५ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा. (त्यामुळे पूर्वी सुरू ठेवण्यास मुभा असलेली दुकानेदेख आता नवीन सुधारित वेळेत सुरू राहतील)

* संचारबंदी:
– दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ (सूट दिलेले अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता)

व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी आली आहे.
प्रेक्षक व समूह यांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.

कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्यास मनाई (वारंवार सनेटायझरचा वापर बंधनकारक) करण्यात आले आहे.

लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेत सकाळी ७ ते सायंकाळी ५ ची वेळ देण्यात आली आहे.दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
केश कर्तनालय/ सलूनसाठी अटी व शर्ती :

१. प्रत्येक ग्राहकाने फोनवर पूर्वकल्पना देऊन वेळ ठरविल्याशिवाय प्रवेश नको.
२. प्रत्येक ग्राहकाने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल/नॅपकिन सोबत आणणे अनिवार्य. नसेल तर प्रवेशास मनाई. एकाचा टॉवेल दुसऱ्यास वापरण्यास सक्त मनाई.
३. सलून साहित्य प्रत्येक ग्राहकास वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक.
४. सलूनमध्ये सेवा देणारा व घेणारा वगळून इतर प्रत्येक दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर असावे.
५.चार पेक्षा अधिक ग्राहकांना थांबण्यास परवानगी नाही.
६. दाढी, केशकर्तन व सलून झाल्यानंतर खुर्ची प्रत्येक वेळी निर्जंतुक करणे आवश्यक.

काय काय सुरू राहणार?
दारुची दुकाने ,वैद्यकिय सुविधा पुरविणारे दवाखाने/ क्लिनिक (OPD)/औषधी दुकाने (२४ तास),कृषी व जनावरांसाठी आवश्यक साहित्याची विक्री,टॅक्सी, कॅब, रिक्शा चारचाकी वाहने (१+२ व्यक्ती),दुचाकी वाहने (१ व्यक्ती), जिल्हा अंतर्गत बस सेवा (५० टक्के क्षमतेने), मालाचा पुरवठा,औद्योगिक आस्थापना (शहरी), औद्योगिक आस्थापना (ग्रामीण), शहरी भागातील सीटू बांधकाम इतर खाजगी बांधकाम स्थळे ,शहरी एकल विक्रेता दुकाने,अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तू,खाजगी कार्यालये,शासकीय कार्यालये (१०० टक्के उपस्थिती आवश्यक), कृषि विषयक कार्य ,बँक आणि वित्त ,कुरियर व पोस्टल सेवा – वैद्यकिय अतितात्काळ सेवांची हालचाल,केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून,प्रेक्षकांना व्यतिरिक्त स्टेडियम , घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट, दुय्यम निबंधक/ RTO/DY RTO,शीतपेयांची दुकाने

** ही सर्व दुकाने शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

* काय काय बंद राहणार?
– हवाई,रेल्वे व मेट्रो प्रवास,आंतरराज्य मार्ग वाहतूक ,शैक्षणिक संस्था,आदरातिथ्य/ हॉटेल,शॉपिंग मॉल्स ,प्रार्थना स्थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे,६५ वर्षे वयावरील व १० वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा,आंतरजिल्हा बस सेवा ,शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून),शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल,सामाजिक/धार्मिक/शैक्षणिक/राजकीय कार्यक्रम/सभा/मेळावे,
-व्यायामशाळा, जल तरणिका,सर्व धार्मिक स्थळे,हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री इ.

* कँटेटमेंट झोनमध्ये फक्त मालाचा पुरवठा ही एकमेव सेवा सुरू राहील.
* असा लागेल दंड:
+ शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड!
* खालील कारणासाठी एक हजार रुपये दंड
१.शारीरिक अंतर ठेवले नाही
२. थुंकल्यास
३.मास्क न वापरल्यास

** नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना ५ हजार दंड व दुकान बंद **

+ लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर

+ ग्राहक जास्त वेळ थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल.

** काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा **

* आपण कोरोना सोबत त्याच्याशीच लढून जगतोय, याचे भान प्रत्येक वेळी असू द्या **
———————————-–————

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply