kinwat today news

भाजपा च्या वतीने किनवट येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र बचाव आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

किनवट 🙁 प्रतिनिधी)
कोविड-19 महामारीवर प्रभावी उपाय योजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र शासन सपशेल अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजकता पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा जबरदस्त विळखा राज्यात बसत असल्याने कोरोना विषाणू अकार्यक्षम सरकारी यंत्रणा पोखरून काढत आहे. त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी चे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने किनवट येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र बचाव आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील करोनाचा विळखा आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टीका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सोबत घेऊन या उपाययोजना करणे अपेक्षित असताना सरकार फक्त दिखावा करत आहे. महाराष्ट्रातला मृत्यू शय्येवर नेणाऱ्या सरकारचा जाब विचारण्यासाठी व सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी आमदार भिमराव केराम, ता.अध्यक्ष संदीप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, नगरसेवक शिवाजी आंधळे, संदेश केराम, संतोष मरसकोल्हे, बाळकृष्ण कदम, फजल चव्हाण, जावेद खान, प्रल्हाद मुंडे, उद्धव मुंडे आदी उपस्थित होते. तर या सर्वांनी मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हे आंदोलन केलं.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply