राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्यावतीने डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण

हिमायतनगर.आज तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव आज सर्वत्र वाढत असल्याने ,मागील 2 महिन्यात शहरी भागात कोरोनाच्या रुग्णामध्ये खूप वाढ होत आहे .हे लक्षात घेत कोरोनाचा प्रदूर्भाव ग्रामीण भागात वाढ होऊ नये व वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यवस्थेतील कर्मचारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्सेस व आशा वर्कर्स, हेल्थ वर्कर्स हे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत. कोरोनाशी लढा देणार्‍या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे.
त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या पुढाकाराने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना. अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे, डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या तर्फे नांदेड सह संपूर्ण राज्यभरात फेस शिल्ड मास्कचे वितरण केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यात यापूर्वी 2 हजार 350 फेस शिल्डचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनात आज दिनांक- 22मे रोजी नांदेड जिल्ह्यातील तालूका हिमायतनगर स्तरावर ग्रामीण रुग्णालय, व प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांचा स्टाफ नर्स, त्या भागातील आशा वर्कर्स व ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे खाजगी डॉक्टर्स यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतगे यांच्या माध्यमातुन फेस शिल्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आध्यक्ष सुनील पतंगे राष्ट्रवादी युवक तालुका आध्यक्ष सरदार खान ,शहर आध्यक्ष उदय देशपांडे ,राष्ट्रवादी मागासवर्गीय आघाडी सतीश वडेकर ,अनंता देवकते,अल्पसंख्यक आध्याक्ष मुबिन ,ग्रामीण रुग्णालयचे डॉ गायकवाड ,तालुका आरोग्य आधिकारि डॉ.पोहरे ,आदि उपस्थित होते

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

1 thought on “राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्यावतीने डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण

 1. With havin so much written content do you ever run into
  any issues of plagorism or copyright infringement?
  My site has a lot of unique content I’ve either authored
  myself or outsourced but it seems a lot of it is popping
  it up all over the internet without my permission. Do
  you know any techniques to help prevent content from being ripped off?
  I’d genuinely appreciate it. adreamoftrains web hosting companies

Comments are closed.