kinwat today news

आज 6 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह.एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 116; – अकरा रुग्णांना सुट्टी.56 रुग्णावर उपचार सुरु आहे.

नांदेड: दिनांक 22 मे साय.5 वाजेपर्यंत च्या अहवालानुकसान आज दिनांक 22 मे 2020 रोजी यात्री निवास एनाराय कोविड सेंटर येथील दहा रुग्ण व एक रुग्ण डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील असे एकूण अकरा रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 116 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 56 रुग्णावर औषध उपचार चालू आहे.

आजपर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 129474 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 2961 रुग्णाचे swab घेण्यात आली आहे. त्यापैकी 2541 तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकूण आज पाठविण्यात आलेल्या 134 रुग्णाचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील व 43 रुग्णांची swab तपासणी चालू आहे. सदर घेतलेल्या एकूण swab यापैकी 116 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेली आहेत .

काल प्राप्त झालेले एकूण 87 आम्हाला पैकी 6 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये 4( पुरुष अनुक्रमे वय वर्षे 14, 18, 33, 74 )व दोन स्त्री (अनुक्रमे वय वर्षे 34, 65 आहेत .त्यामधील एका पुरुष रुग्णाचा वय वर्ष 74 यांचा मृत्यू झाला आहे. सदरील रुग्णांपैकी 2 मुखेड तालुक्यातील, 1 बिलोली तालुक्यातील, 1रुग्ण प्रवासी एन आर आय भवन येथे व उर्वरित 2 रुग्ण हे नांदेड शहरातील लोहार गल्ली भागातील आहेत.

एकूण 116 रुग्णांपैकी 6 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. व 52 रुग्ण आहे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 56 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोविड केयर सेंटर, यात्री निवास कोविंड केअर सेंटर येथे 42 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोविड केअर सेंटर मध्ये 1 उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे हे 3, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण, व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे हे 1 रुग्ण असून सर्व रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.

तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवताली कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास आपणास सदर अँप सतर्क करण्यास मदत करते. असे आव्हान डॉक्टर नीलकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांनी कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply