kinwat today news

मातंग समाजामधील बँड व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळणे बाबत नायब तहसीलदार यांना लहुजी शक्ती सेनेचे निवेदन.

हिमायतनगर. (राजु गायकवाड) महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गजन्य कोविड19. रोगाने थैमान घातल्याने मातंग समाजाच्या बँड व्यावसायिकांचे त्यांचं लग्न सराईचा हंगाम वाया गेला यामुळे बँड व्यवसायिक का सह त्यांची मुलं बाळासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.मार्च. एप्रिल. मे. जुन. या महिन्यात लग्न साखरपुडा वरात आदी.शुभप्रसगांचे निघुन गेल्याने हातांवर पैसा नसल्याने आर्थीक टंचाई भासत आहे.तरी महाराष्ट्र शासन.केंद्र शासन सामाजिक न्याय विभाग. यांनी तात्काळ बँड कुटुंबाचे पुनर्वसन करावे. अन्यथा येत्या काही दिवसात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य हिमायतनगर यांच्याकडून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती.असे त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष. राजूभाऊ गायकवाड. युवा अध्यक्ष विकास गाडेकर. सहसचिव प्रशांत महाजन. सामाजिक कार्यकर्ते. धोंडोपंत बनसोडे.अनिल गाडेकर.आदी जणांने दिनांक.२१/०५/२०२०रोजी. नायब तहसीलदार. तामसकर साहेब हिमायतनगर यांना निवेदन देण्यात आली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply