kinwat today news

अखेर दिव्यांगाचा निधी लाभार्थीच्या खात्यावर जमा – अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना चे ता.सचिव राज माहुरकर यांना यश.

किनवट प्रतिनिधी – दिव्यांगाचा तीन वर्षापासून चा राखीव निधी खर्च न केल्यास जिल्हा परिषद नांदेड समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांनी दिला होता.
सदरील निवेदनात 1) तीन वर्षापासून चा राखीव निधी खर्च करण्यात यावा. 2) दिव्यांगा ची हेळसांड करणाऱ्या ग्रामसेवक यांच्या कामाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. 3)ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी. अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या होत्या.
अखेर अखिल भारतीय दिव्यांग कामगार वेळोवेळीसंघटना तालुका किनवट चे सचिव राज माहुरकर यांनी ग्रामपंचायत गोकुंदा येथील दिव्यांगांचा राखीव 5%टक्के निधी खर्च करण्याबाबत वारंवार आंदोलनाला यश आले. अखेर दिव्यांचा 5 टक्के राखीव निधी 3,95,878 रुपये एकूण 46 लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 8100 रुपये वर्ग करण्यात आले आहे.

यासाठी किनवट किनवट टुडे न्युज नी ही वेळोवेळी या विषयी ची बातमी प्रसिद्ध करून दिव्यांगाचा आवाज बुलंद केला होता.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply