kinwat today news

खरीप हंगाम पीककर्ज मागणीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात यावी -खासदार हेमंत पाटील

किनवट ता.प्रतिनिधी : खरीप हंगाम 2020-21 साठी पीककर्ज घेण्यास मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी इच्छुक आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू करावी असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत .
जागतिक महामारी कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे . बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात हिंगोली लोकसभा क्षेत्रातील शेतकरी पीककर्ज घेण्यास इच्छुक असून प्रशासनाने शेतकरी हित लक्षात घेता ऑनलाइन नोंदणी सुरू करावी असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. नोंदणी केल्यानंतर शेतकर्यांंची यादी जिल्हा अग्रणी बँक मार्फत संबधित बँकेकडे पाठवून देण्यात यावी त्यानंतर संबंधित बँक पुढील कार्यवाही शासनाच्या कार्यप्रणालीनुसार करणार आहे, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .
खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाची धुरा हाती घेतल्यापासून शेतकरी हित जोपासले आहे . मागील चार वर्षापासून प्रलंबित असलेला पिकविमा यंदाच्या हंगामात 124 कोटीचा मंजूर करून घेतला. तसेच हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात घेवून हळद प्रक्रिया उद्योग उभारून हळद बोर्ड स्थापन करावा अशी मागणी वाणिज्य समितीकडे यापूर्वी केली आहे . अतिवृष्टी मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने थेट शेतकर्यां च्या बांधावर जावून पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली होती. मतदारसंघाच्या सर्वच तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत . फळपिकांच्या साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेज तयार करावेत .खरीप हंगामात शेतकर्यांना उत्तम व दर्जेदार खते ,बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे . याच अनुषंगाने सध्या किनवट तालुक्यात मका ,ज्वारी,कापूस तर उमरखेड ,वसमत तालुक्यात कापसाची हमिभावाने खरेदी करण्यास सुरवात झाली आहे . यामुळे हिंगोली मतदार संघातील शेतकरी सुखावला असून या पार्श्वभूमीवर पीककर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी,अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply