kinwat today news

दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला ढाणकी येथील मुलीचा विवाह

ढाणकी प्रतिनिधी…..
संचाबंदी काळातील नियमांचे पालन करीत उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील मुलगी सुनिता व निकेश यांचा विवाह सोहळा अवध्या दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंन्सिगचा अवलंब करीत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात येथे नुकताच पार पडला दोन महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता 19 मे रोजी विवाह सोहळ्याची तारीख काढण्यात आली होती परंतु अचानक कोरोना विषाणूचे संकट आल्याने सर्वत संचारबंदी लागू करण्यात आली विवाह टाळण्यासाठी वर-वधू पक्षांकडील मानसिकता नव्हती त्यामुळे लग्नसोहळा नियोजित दिवस पार पाडण्यात आला त्यासाठी नवरदेव ढाणकी येथे पोहोचला केवळ दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे अवलंब करीत लग्न समारंभ पार पडला उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील छबुराव चिचबनकर यांची मुलगी व आर्णी तालुक्यातील सुकळी येथील किसन किनकर यांचा मुलगा यांचा विवाह अगदी साधेपणाने सर्व नियमांचे काटेकोर पालन करून फाटा देऊन पार पडला या विवाहाची परिसरात चर्चा असून दोन्ही परिवारांनी साध्या पद्धतीने विवाह करुन एकप्रकारे कोरोनाविरुद सुरू असलेल्या लढयात आपले योगदान दिले आहे या विवाह सोहळण्यासाठी वर पक्षाकडून प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आल्याची माहिती दोन्ही कुटुंबांनी दिली

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply