kinwat today news

नांदेड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या झाली 106; बरे झालेल्या 36 रुग्णांना सुट्टी.

नांदेड: आज दिनांक 20 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या अहवालानुसार- आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 124600 व्यक्तीची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 2761 रुग्णाचे swab घेण्यात आले आहे. त्यापैकी2452स्वब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून आज नवे 31 व्यक्तीचे स्वब घेण्यात आले व 46 स्लॅब प्रलंबित आहेत. एकूण 77 तपासणी चालू आहे. सदर घेतलेल्या swab यापैकी 106 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज 8 पॉझिटिव्ह रुग्णापैकी 5 रुग्ण पुरुष(अनुक्रमे वय वर्षे 4,25,34,54, 55,) व 3 स्त्री(अनुक्रमे वय वर्षे 28,41,50) आहेत त्यापैकी 6 रुग्न कुंभारटेकडी ,1 करबलानगर व 1 अचबलनगर येथील असून त्यांच्या वर पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे औषध उपचार सुरू आहेत. सध्यास्थितीत यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे चालू आहे. आज दिनांक 20 मे 2020 रोजी पंजाब भवन यात्री निवास येथील 6 रुग्ण औषध उपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
एकूण 106 रुग्णांपैकी 5 रुग्णाचा मृत्यू झाला 36 रुग्ण औषध उपचारांमुळे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 63 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर 51, ग्रामीण रुग्ण बारड येथील धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे 2 रुग्ण असून त्या सर्व रुग्णावर औषधउपचार सुरु आहे.
तरी सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवताली करोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अँप सतर्क करण्यास मदत करते.असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply