kinwat today news

कोरोना संकटकाळी किनवट शहरातील पोलीस बांधव,पत्रकार व न.पा.कर्मचाऱ्यांना थंड पेयाचे वाटप

किनवट:         कोरोना या संकटकाळी देशातील पोलीस बांधव तसेच पत्रकार हे या महामारी मध्ये सुद्धा आपले कर्तव्य चोख बजावत असून त्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिलासा म्हणून पौर्णिमा मार्केटिंग एेजन्सी किनवट चे संजय मेहता, संजय नेम्मानिवार, चेतन पंड्या, विश्व बंधुत्व आदिवासी सेवाभावी संस्थेचे बाळकृष्ण कदम, गौतमेश पंड्या, राजेंद्र भातनासे यांच्या तर्फे थंड पेयाचे वाटप करण्यात आले.यासाठी हिंदुस्थान कोका- कोला चे जनरल मॅनेजर राहूल पटवर्धन,औरंगाबादच्या एरिया मॅनेजर वैभव साबणे. यांचे मार्गदर्शन लाभले.


थंड पेयाचे किट पोलीस स्टेशन येथे वाटप करण्यात आले या प्रसंगी पो.नि. मारोती थोरात, एपी.आय .राहूल भोळ, पी.एस.आय .गणेश पवार,अप्पाराव राठोड, परमेश्वर गाडेकर, नारायण संदूपटलवार, कोलबुद्देआदी उपस्थिती होते. तर नगर परिषद किनवट तेथे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, सभापती व्यंकट नेम्मानिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, मधुकर अन्नेलवार संतोष चनमनवार,मुख्याधिकारी सुंकेवाड, फेरोझ तवर, बालाजी धोत्रे, शिवाजी आंधळे, साजीद खान,लेखापाल बिरादार, राहूल निकम, अझर भाई, राहूल सातूरवार आदी उपस्थित होते.
तसेच पत्रकार बांधवांना पण थंड पेयाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ता.अध्यक्ष अनिल भंडारे,आनंद भालेराव, दत्ता जायभाये,अनंतवार,विजय जोशी,जगदीश समानपेल्लीवार, विश्वास कोल्हारीकर,प्रशांत वाठोरे, तथागत गायकवाड किरण ठाकरे चतुरंग कांबळे, साजिद बडगुजर,ऍड. मिलिंद सरपे आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply