kinwat today news

नांदेडकरासाठी दिलासा 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले;61 रुग्णांवर औषधोपचार सुरु प्रकृती स्थिर.

        नांदेड, दि. 19 :- शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एन.आर.आय. भवन येथे औषधोपचार सुरु आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. कोरोना विषाणु संदर्भात मंगळवार 19 मे 2020 रोजी सकाळी 11 वा. नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 17 व 18 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 182 स्वॅबपैकी 28 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एक रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण संख्या 98 झाली आहे. आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले 5 रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

6ह

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply