kinwat today news

ब्रेकिंग- आज दि.18 मे रोजी प्रधानसांगवी येथील गोठयास आग लागून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

किनवट/प्रतिनिधी— किनवट पासून 7 की मी अंतरावर असलेल्या प्रधान गांवी येथील शेतकरी अंगद बापूराव चव्हाण (गुंडाळे) यांच्या शेतातील गोठयास आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज (१८ मे २०२०) दुपारी २ ते ३ वाजताचे दरम्यान प्रधानसांगवीतील अंगद बापुराव चव्हाण (गुंडाळे) यांच्या शेताततील गोठ्यास लागलेल्या आगीत दोन गाई व दोन म्हशी भाजल्या गंभीर भाजल्या गेल्या. दोन वगारांचा भाजून मृत्यु झाला आहे. दोन हजार पेंढी कडबा व अन्य चा-यांसह गोठा जाळून खाक झाला आहे.
आज लागल्याचे समजताच किनवट न.प.च्या अग्नीशमन गाडीने ही विझवण्याचे काम केले. पशु वैद्यकीय अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करुन जखमींवर तात्काळ उपचार केले.
प्रधानसांगवीतील अंगद बापुराव चव्हाण या शेतक-यांवर प्रचंड अाघात झाला आहे. दहा जनावरांना पावसाळभर पुरेल एवढा चारा विकत घेतला होता. त्या चा-याने पेट घेतल्याने पूर्ण गोठ्याला आग लागली. तेंव्हा शेतक-याला शासनाने तात्काळ मदत करण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात गावातून होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply