kinwat today news

किनवट: दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री करण्यात येणारी वन्य प्राण्यांची गणना केलीच नाही

किनवट/प्रतिनिधी— कोरोना विष्याणु (कोवीड १९) संक्रमन टाळण्यासाठी लाॅकडाऊनची सबब पुढे करुन यावर्षीची करण्यात येणारी वन्यप्राणी गणनाच केलेली नाही. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाण्याची साठवण असलेल्या ठिकाणी कॅमे-यांच्या सहाय्याने वन्य प्राण्यांचे चित्रण करुन संख्या निश्चीत केली जाते. वन्यप्राण्यांची गणना करण्या इतपत पाण्याची साठवण नसल्याने गणना होऊ शकली नाही हे एक कारण असु शकते. सोशल डिस्टन्सचे उलंघन होईल म्हणून चक्क वन्यप्राणी गणनाच टाळली असल्याचा केविलवाणा खुलासा किनवट वनविभागाने केल्याचे समजते. मग लाॅकडाऊनच्या काळात इत्तर कामे केलीत की, सोशल डिस्टन्ससाठी कागदावरच कामे आटोपलीत ? याबद्धलही खुल्लासा होणे अपेक्षित आहे. नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह औरंगाबादच्या मुख्य वनसंरक्षकांनी या प्रकरणी चौकशी करणे नितांत गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.
या वर्षीची बौद्ध पौर्णिमा ७ ते ८ मे च्या रात्री होती. या रात्री वन्यप्राणी गणना होणे आवश्यक होते. प्रत्येक पाणोठ्यावर मचाण उभारले जाऊन त्यावर दोनच व्यक्ती असतात तेंव्हा सोशल डिस्टन्सचा प्रश्नच कुठे उद्भवतो ? मागच्या वन्यप्राणी गणनेत असाच निष्काळजीपणा केल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली होती. एकच बिबट्यावाघ असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आतापर्यंत चार बिबट्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर मात्र वनविभाग (प्रादेशिक) व वनविकास महामंडळ प्रशासनाची पोलखोल झाली आहे. आता कांही बांडगुळांना हाताशी धरुन चार बिबटे मृत्यु प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी विदर्भातील टिप्पेश्वर अभयारण्यातून पट्टेदार वाघांचाही वावर वाढल्याची नसती सबब पुढे करण्याची कोशिष केली आहे. तसे असेल तर मृत पावलेले चार बिबटे आले कुठून ? असा सवाल उपस्थित होतो. किनवट तालुक्यापेक्षा पश्चिमेकडील विदर्भातील पेनगंगा अभयारण्या व उत्तरेकडील टिप्पेश्वर हे घनदाट अभयारण्य आहेत. पूर्वेला तेलंगाणा राज्यातील बेसुमार जंगलाने व्यापलेली सिमा असून तेथिल वन्यप्राण्यांना त्याच परिसरात खाण्याला भक्ष आणि पिण्याला भरपूर पाणी असतांना त्यांच्या मानाने जंगल नेस्तनाबूत होत असलेल्या किनवट तालुक्याच्या जंगलात त्यांच्या तिकडील बिबट्यांसारखे वन्यप्राण्यांचा वावर होत असावा हा खुल्लासा किनवटकरांना हजम होणार ठरणार नाही.
अर्थार्थी लाॅकडाऊन आणि वन्यप्राणी गणनेचा सूतराम संबंध येत नाही. कोवीड १९ च्या विष्याणुने कांही वन्यप्राण्यांना घेरलेले नाही की, त्यांच्या संपर्कात आल्याने कर्तव्य बजावणा-यांना लागण होईल असेही काही नाही. ना वनकर्मचा-यांना बाधा पोहोचलेली नाही. अथवा त्या गणनेचे चित्रण टिपतांना वनकर्मचा-यांना एकदुस-याला चिटकून बसायचे नाही. मग सोशल डिस्टन्सचा बहाणा कसा पुढे केला ? याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, नाही तर किनवट वनविभागाच्या प्रशासनाची ही कृती वरिष्ठ प्रशासनाला दिशाभूल करणारी ठरु शकते. किनवट तालुक्यात काय चालु आहे हे जाणून घेण्याचा नागरिकांचा हक्क डावलून मनसोक्तपणे अधिका-यांच्या मर्जीप्रमाणे चालेल असा कयास त्यांनी बांधला असेल तर तो नागरिकांना घातक ठरणारा असेल यावर तर्कवितर्काने जोर धरला असल्याचे चित्र दिसते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply