kinwat today news

नांदेड ब्रेकिंग: रविवारी आणखी १३ पॉझिटिव्ह- नांदेडची वाटचाल शंभरीकडे! रुग्ण संख्या झाली ९७.

नांदेड: आज दिनांक 17 मे 2019 रोजी दुपारी बारा वाजता पर्यंत च्या अहवालानुसार दिनांक 14/ 5/ 2020 ते दिनांक 16/5 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 374 स्वब पैकी सर्व 374 रुग्णांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये एकूण 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्ण संख्या 97 झाली आहे.

आज एकूण 13 पॉझिटिव रुग्णांपैकी 9 रुग्ण प्रवासी आहेत. 1 रुग्ण करबला भागातील असून 2 रुग्ण हे अबचलनगर भागातील व ग्रामीण रुग्णालय बारड येथील 1 रुग्ण आहे . सदरील रुग्णांपैकी 12 पुरुष अनुक्रमे वय वर्षे (13, 14, 14, 19, 24, 25, 30 ,37, 44, 50, 59, 74) तसेच (1 स्त्री वय वर्षे 57 )आहेत. सदरील रुग्ण हे यात्री निवास व एन आर आय भवन व ग्रामीण रुग्णालय बारड येथे हे औषध उपचार घेत आहेत. सध्यास्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.

एकूण 93 रुग्णांपैकी 26 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे .64 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन केअर सेंटर व यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे 54 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोविड केअर सेंटर मध्ये 2 रुग्ण असून सर्व रुग्णावर औषधोपचार सुरू आहे.
औषध उपचारास प्रतिसाद न दिल्याने एकूण 5 रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण आहे रक्तदाब मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतु ॲप” डाऊनलोड करून घ्यावे जेणे करून आपल्या सभोवताली कोरोनाचा रुग्ण असल्यास आपणास सदरील अँप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply