kinwat today news

किनवट मध्ये सोशल डिस्टनसिंगचा उडत आहे फज्जा

किनवट/प्रतिनिधी— लाॅकडाऊनच्या काळात किनवट शहराती बँकेत चिक्कार गर्दी होणे स्वाभाविक दिसते, कारण ग्रामिण भागातील शेतक-यांना अन्य कांहीच पर्याय नाही. परंतु या नागरिकांकडे बोट दाखऊन आपण मात्र दररोज संध्याकाळी बार अँड रेस्टारंटमध्ये मध्यधूंद होतांना डिस्टन्सींगचे पालन करता काय ? असा सवाल वैतागलेल्या नागरिकांनी केला आहे. भारतीय स्टेट बँकेने ग्रामिण भागातील लोकांच्या सेवेसाठी उघडलेले परवानाधारक ग्राहक सेवा केंद्र हे ग्रामिण भागात न चालवता शहरी भागात चालवले जात असल्याने ग्रामिण नागरिकांची पायपीट व त्यातून होणारी गर्दी दिसून येत आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमूख व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय मुरमुरेंनी या गर्दीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे ग्राहक सेवा केंद्र ग्रामिण भागात पाठवावेत. शिवाय पोलीस यंत्रणेसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेशित करुन बार अँड रेस्टारंटमध्ये नियमबाह्य दररोज मध्यपिंच्या होत असलेल्या रंगेल पार्ट्यांना टाच लावण्याची काळाची गरज असल्याचे ग्रामिण लोकांचे म्हणने आहे.
सद्या शेतक-यांच्या खरीप हंगामांचे दिवस डोक्यावर येत आहेत. आर्थिक उलाढाल करणारे महिला व पुरुष गटं लाॅकडाऊन तसेच संचारबंदीमध्ये बंदावस्थेत पडल्याने ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे बेहाल होत आहेत. भारतीय स्टेट बँकेने ज्या परवानाधारकांना ग्रामिण भागात ग्राहक सेवा केंद्र दिलीत ते ग्रामिण भागात न चालवता त्यांनी थेट शहरातच बस्तान बसविले आहे. ग्रामिण नागरिकांचा नाइलाज म्हणून बँकांच्या कामासाठी शहराकडे जीव धोक्यात घालून आणि काम सोडून यावे लागत आहे त्यात त्यांना खुशी नाही. उलटपक्षी वेळ आणि पैसा वाया घालावा लागत आहे. एकाच वेळी काम होईल असे नाही चार-चार चकरा मारल्याशिवाय काम होत नाही हे वास्तव आहे. अशा वेळी गर्दी होऊच नये, फिजीकल डिस्टन्स असलेच पाहिजे अशा अपेक्षा करणे कितपत योग्य वाटतात ते आता प्रशासनानेच ढरवायला पाहिजेत. निर्धारीत वेळेचे भान ठेऊन मात्र व्यवहार केले जात असल्याचे पहायला मिळत आहे.
कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर संक्रमन टाळण्यासाठी लाॅकडाऊनचे अस्त्र वापरले आहे. याच काळात दारु बंद करण्यात आली असतांना देखिल शहरातील कांही बार अँड रेस्टारंटवर दररोज रंगेलपार्ट्या होतात त्यांनी ग्रामिण लोकांच्या विषयी बोट दाखवावे याबद्धल लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने अशा रेस्टारंटवर दररोज नियंत्रण ठेवल्यास मध्यपींचे उच्चाटन करण्यास मदत होईल. त्यांनी चक्क कायद्याला झुगारुन एक कलमी मध्यावर जोर दिला आहे तो थांबेल असे अनेकांचे म्हणने आहे. स्थानिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमूख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.उत्तम धुमाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय मुरमुरे यांच्यासह सर्व संबंधितांनी त्या त्या क्षेत्रात बारकाईने लक्ष घालून ग्रामिण जनतेच्या समस्यांना प्राधान्यांने घेऊन सोडवाव्यात अशा अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. शहरातील गर्दी कमी करायची असेल तर शहरातील लाॅकडाऊन कटाक्षाने पाळण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. तेंव्हा ग्रामिण लोकांची गर्दी दिसणार नाही. बँकांचे ग्राहक सेवा केंद्रचालकांचे परवाने तपासून त्या त्या ठिकाणी ते केंद्र हलविली तर ग्रामिणांचा लोंढा कमी होण्यास मदत होईल. बि-बियाणे, रासायनिक खते, किटक नाशक औषधी व कृषी विषयकची लोखंडी अवजारे गावपातळीवर पुरवठा केल्यास किनवटात गर्दी होणार नाही, अशा प्रतिक्रिया ग्रामिणांकडून व्यक्तविल्या जात आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply