kinwat today news

मांडवी: गुजरात राज्यातून पायी चालतआलेल्या चार मजुरांना करण्यात आले होमकोरोन्टाईन

मांडवी इंद्रपाल कांबळे
मांडवीपरिसरात जमुना नगर येथे थेट गुजरात राज्यातून सुरत येथून पायी चालत आलेल्या मुलांना गावातील शाळेत होम कोरोन्टाईन करण्यात आले असे प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथील आरोग्य अधिकारी डॉ. वामन बहत्ररे यांनी सांगितले .
दरम्यान कोविड-19प्रदुभाव वाढ नये यासाठी मांडवी परिसरामध्ये गाव पातळी वर प्रस्थापित होत असलेल्या आँटी कोरोना फोर्स व दक्षता समिती यांच्या माध्यमातून गावात परराज्यातून येणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात आहे व आलेल्या नागरिकांचे नाव गाव माहिती घेऊन ती संबंधित आरोग्य विभागास कळविले जात आहे.
काल मांडवी पासून जवळ असलेल्या जमुनानगर येथे गुजरात राज्यातून सुरत येथून चार मजूर हे व एक मजूर हा औरंगाबाद येथून आला याना यावेळी कोठारी येथील ग्रामसेवक प्रवीण पवळे व आरोग्य अधिकारी डॉ.वामन बहात्तरे यांनी या चार मुलांची तपासणी करून प्राथमिक उपचार केले व पाई प्रवास केल्यामुळे थकल्यास या लक्षणा मुळे त्यांना गावातच प्राथमिक उपचार केले त्यांना गावातील शाळेत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले 21 दिवस कोणा च्याही संपर्कात येऊ नये असे सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी घेत आहे कोरोना विषाणूची दक्षता आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कोठरीयांच्या नियंत्रणसर्वेनुसार या पी एस सी अंतर्गत 36 गावे येतात 858 व्यक्तींचे तपासण्या करण्यात आले व आतापर्यंत 634 व्यक्तींना होमकोरनटाइन करण्यात आले व सद्या224 होम कारण टाइन त्याना घरी नियंत्रनात ठेवण्यात आलेआहे. कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास अर्थसहाय्य करण्याचे कार्य कोठारी ग्रामपंचायत करणार आहे या आरोग्य केंद कोविड 19 च्या उपचारासाठी 10 कॉटाचे साहित्य घेतल्या जात असल्याचे नियोजन करण्यात येतआहे.असे कोठारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रवीण पवळे यांनी सांगितलेले आहे.
मांडवी परिसरापासून माहूर तालुका जवळ असल्याने माहूर मध्ये कोविड 19 रुग्ण आढळल्यामुळे मांडवी परिसरात कोरोना विषाणु संसर्गाची लागण होते की काय या भीतीने ग्रामीण भागात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी डॉ. वामन बहतरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की मांडवी परिसरामध्ये ग्रामीण भाग आसुन उष्णतेचे प्रमाण असल्यामुळे कोवीड जास्त प्रमाणात होउ शकत नाही.
तरीही सुरक्षित रहा व घरीच रहा असा संदेश त्यांनी दिला व प्रशासकीय तयारीची माहिती सांगताना मांडवी परिसरात एक ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे शंभर कोर्टाचे सर्व सुविधायुक्त नियंत्रण कक्ष निर्माण केलेले आहे शासकीय नेत्र रुग्णालय मांडवी येथे शंभर काटाचे अतिरिक्त नियंत्रण कक्ष निर्माण करण्याचे काम चालू आहे व प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथे पण दहा कॉटाचे सुविधा उपलब्ध करण्यात येत असून आरोग्य यंत्रणा या कोरोना विषनुशी लढण्यास सक्षम आहे नागरिकांनी काही घाबरण्याची कारन नाही असे आरोग्य अधिकारी डॉ.वामन बहतरे यांनी सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply