kinwat today news

नगर परिषद किनवट प्रशासनाव्दारे शहरातील नागरीकांना दुर्गंधीत व अस्वच्छ पाणी पुरवठा

किनवट ता.प्र दि १५ नगर परिषद किनवट प्रशासनाव्दारे शहरातील नागरीकांना दुर्गंधीत व अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे पाणी पुरवठा सुधारला नाही तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व नगरसेवका तर्फे नगर परिषद प्रशासना विरोधात जनआंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दिले आहे.
      सर्वत्र कोरोना विषाणुने थैमान घातला आहे यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असुन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे परंतु किनवट नगर परिषदेकडुन नागरीकांना दुषित पाणी पुरवठा करुन आरोग्य धोक्यात टाकण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे
      शहरात नगर परिषद प्रशासना कडुन पाणी पुरवठा व पाणी पुरवठा प्रक्रीयेवर लाखो रुपये महिण्या काठी खर्च करण्यात येतात परंतु स्वच्छ पाणी केला जात नाही तरी या वर्षी पाणी पुरवठा यंत्रणेवर पाहिजे तेवढा ताण नाही कारण लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ बंद आहे, शहरात बाहेरगावाहुन येणा-या नागरीकांची संख्या कमी आहे तर शहरातील कार्यालये बंद आहे यामुळे पिण्याच्या पाण्याची खपत कमी आहे याचा लाभ असा झाला कि जे शहरातील वॉटर प्लॉट व्दारे पाण्याचा उपसा करुन शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवत होते ती पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरात जमिनीखाली पाण्याचा स्तर मे महिण्यात ही टिकुन आहे यामुळे नागरीकांच्या घरी बोर अजुन ही कार्यान्वित आहे एकुणच पाणी टंचाई भासत नाही आहे. नाही मागच्या वर्षी या महिण्यात शहरात टेन्करव्दारे पाणी पुरवठा केला जात होता आता हा ही ताण नगर परिषद प्रशासनावर नाही यामुळे आहे त्या संसाधनाव्दारे नगर परिषदेने योग्य ती प्रक्रीया करुन नागरीकांना पाणी पुरवठा केला तर नागरीकांच्या आरोग्याच्या दृषीने हितावह राहणार आहे.
      तर नागरीकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे याकरीता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकां तर्फे नगर परिषद प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply