वारंगटाकळी येथे विज पडून शेतकर्यांचा मृत्यू  तिघेजण गंभीर जखमी

 हिमायतनगर प्रतिनिधी/– हिमायतनगर तालुक्यात दि.14 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासुन ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट सुरू झाला होता.या मध्ये शेतकरी आपल्या शेतातील वैरण झाकण्यासाठी गेले असता  वारंगटाकळी येथील चार शेतकरी तिळ झाकताना अचानक विज कडाडली यात एका शेतकर्यांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
        हिमायतनगर पाहून पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या वारंगटाकळी परिसरात गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू होता यातच तरूण शेतकरी कपिल आनंद कदम वय(25) यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली तर सोबत गेलेले तिघेजण गंभीर जखमी झाले असुन त्याना हिमायतनगर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले आहे.
    तरूण शेतकर्यांचा घटनेत मृत्यू झाल्यामुळे वारंगटाकळी गावावर शोककळा पसरली आहे.

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.