kinwat today news

लोणी झेंडेगुडा येथील रोशन भालेराव यांच्या शेतातील मोहाच्या झाडावर अचानक पडली वीज ;कोणतीही जीवित हानी नाही.

किनवट: आज दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटा सह झालेल्या अवकाळी पावसात सायंकाळी 6 वाजता किनवट तालुक्यातील लोणी झेंडेगुडा येथील रोशन शामराव भालेराव यांच्या घरापासून जवळच असलेल्या शेतातील मोहाच्या झाडावर अचानक वीज पडल्या मुळे मोहाच्या ओल्या झाडालाच आग लागल्या मुळे गावातील नागरिकांची लागलेली आग पाहण्यासाठी तोबा गर्दी जमलेली होती. सुदैवाने या झाडाखाली कोणीही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र ओले झाड जाळुन खाक झाले. जसे काही झाडावर फुलझडी लावल्यागत दृश्य दिसून येत होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply