kinwat today news

तोंडारपाटी येथील 50 गरजु कुंटूबाना तोंडार वस्तीवर तांदुळ वाटप

हाळी हंडरगुळी :लक्ष्मीकांत मोरे
उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी वस्तीवर हातावर पोट असलेले गरजु 50 कुंटूबांना तांदुळ वाटप करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग लातुर उपजिल्हाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत मोरे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा.डाँ.बंकट कांबळे ,हंडरगुळी येथील सोसायटी चेअरमन शिवाजीराव भोसले,समाजसेवक दिपक कांबळे वायगावकर यांच्या तर्फे तांदुळ वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नेय यासाठी पोलिस,प्रशासन यांचे काळजी पुर्वक प्रयत्न चालु आहेत.राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहता शासनानास लाँकडाऊन वाढवावे लागत आहे. त्यामध्ये गरीब होतकरु नागरीकांना ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना काही ठिकाणी सामाजिक संस्था, समाजसेवक, व शासनाकडून मदत करण्याचा प्रयत्न चालुच आहे.
मात्र उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथील तोंडारवस्ती या ठिकाणी शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. शकली येथे 50 कुंटूब हातावर पोट असणारे कुंटूब आहेत. काम केले तरच यांची चुल पेटते. या ठिकाणी वडर,वैदु,सोनार,कैकाडी,मातीवडर,फकीर,मागासवर्गीय आदी जमातीचे लोक राहतात.सोनार या जामातीचे हे नागरीक हातातील अंगठी,बाळाचे वाळवे,हातातील कंगण,महिलासाठी जोडवे,कानातील काडी,बनवण्याचे काम करतात. निजामबाद येथील रहीवासी 20 वर्षापासुन या ठिकाणी राहतात त्यांना स्व:चे छप्पर नाही कच्चे घर करुन राहतात.आजुबाजूच्या परीसरातील यात्रेत तसेच गावोगाव फिरुन वस्तू विक्री करुन संसार भागवतात याच मिळणा-या मोबदल्यावरच ते अवलंबुन असतात मात्र लाँकडाऊनमुळे विक्री व्यवसाय बंद असल्याने उपासमारीला लहान मुलांसह आजोबा पर्यंत सर्वाना तोंड दयावे लागत आहे. तसेच मातीवडर जमातीचे लोक उदगीर नाक्यावर जाऊन जिकडे काम लागेल तिकडे जाऊन कुंटूबाची भुक भागवत होते,कुंटूब कैकाडी या जमातीचे आहेत सिंधाडी टोपली,दुरडी,कोंबडयाचे खुराडे,शेतीकामासाठी लागणारी डाल,बनवण्याचे व्यवसाय करतात मात्र लाँकडाऊनमुळे विक्री बंद आहे.काही मागासवर्गीय व्यक्ती रोजगार करतात.
या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, लाईट व्यवस्था नाही,पाणी विकत घ्यावे लागते,दिवसेदिवस उन्हाळा वाढत आहे.हाताला काम नाही जवळ पैसा नाही पाणी कसे पिणार असा प्रश्न उभा आहे.वर्षभर पाणी विकत प्यावे लागते, लाँकडाऊन मुळे घराच्या बाहेर पडणे बंद आहे हाताला काम नाही कुंटूबात लहान मुलं आहेत त्यांच्या घरी राशन उपलब्ध नाही येथील कुंटूबावर उपासमारीची वेळ आली आहे. येथील ब-याच कुंटूबाकडे राशन कार्ड नाही म्हणुन शासनाच्या राशन योजनेपासुन वंचीत आहेत व कसलीही राशनची मदत होत नाही.
शासन व इतर सामाजिक संस्था समोर येऊन येथील कुंटूबाला मदत करावी अशी मागणी येथील कुंटूब करीत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply