kinwat today news

“विशेष श्रमिक रेल्वेने” उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे 1 हजार 464 मजूरांचे झाले रवाना “भारत माता की जय” या घोषणा देवून आनंद व्यक्त

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले 1हजार 464 मजुरांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून “विशेष श्रमिक रेल्वे” ने आज सायंकाळी 6.25 वा. उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला. मजुरांच्या चेहऱ्यांवर आपण आपल्या गावी जात असल्याचा आनंद दिसत होता. उपस्थितांनी टाळ्या वाजवून “भारत माता की जय” या घोषणा देवून आनंद व्यक्त केला. तसेच मजूरांनी प्रवासा दरम्‍यान जिल्‍हा प्रशासनाला आभार मानत धन्‍यवाद देत होते.

यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड, रेल्‍वे विभागाचे कालीचरण आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश येथील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी नांदेड येथून रेल्वे सोडण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण तयारी केली होती. या प्रयत्नामुळे मजुरांना घरी जाण्याचा दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा खर्च प्रशासनाने केला आहे. जिल्‍हा प्रशासन व स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍यावतीने प्रवासापूर्वी मजुरांची थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, प्रवासात जेवण, नाश्ता, पाणी बॉटल तसेच आवश्यक सुविधा सोबत देऊन सामाजिक अंतर राखून मजुरांना रेल्वे बोगीपर्यंत सोडण्यात आले होते. त्यानंतर “विशेष श्रमिक रेल्वे” ने त्यांचे उत्तरप्रदेशकडे प्रयाण झाले.

लॉकडाऊन काळात नांदेड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या मजुरांची नांदेड येथील विविध मंगल कार्यालयात तसेच शिबिरांमध्ये राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नांदेड तरोडा भागातील विश्वलक्ष्मी मंगल कार्यालयात परराज्यातील 85 लोकांची मागील एक महिन्यांपासून निवास व जेवण्याची व्यवस्था केली होती. त्यापैकी 65 लोकांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून “विशेष श्रमिक रेल्वे”ने उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे रवाना करण्यात आले.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply