kinwat today news

जीव धोक्यात घालून कर्तुत्व बजावणा-या परिचारिकांना प्रोत्साहनपर भेट वस्तुंचे वाटप

किनवट : दि. 13
कोवीड १९ या विश्वस्तरीय महामारीच्या काळात यौध्यांची भूमिका बजावणा-या परिचारिकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिनाच्या औचित्यावर उपजिल्हा रुग्णालयासह नागरी दवाखान्यातील परिचारिकांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जीव धोक्यात घालून कर्तुत्व बजावणा-या परिचारिकांना प्रोत्साहनपर भेट वस्तुंचे वाटप करण्यात आले.
करोनाता प्रादुर्भावामुळे रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नांदेड जिल्ह्य़ातही करोना संसर्गाची लागन झाली असुन 65 च्या जवळ संख्या गेली आहे. किनवटला चहूबाजूंनी कोरोनाने वेढा घातला आहे. परंतु किनवट मध्ये आजपर्यंत कोरोना शिरकाव करु शकला नाही. यात परिचारीकांची सुद्धा महत्वाची भुमिका आहे.
अशा परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या परिचारिका आदिवासी, दुर्गम भागातही कमी साधनासह आपल्या जिवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहे. त्यांना आपल्या कामास प्रोत्साहन मिळावे ही सामाजीक बांधीलकी म्हणून संजय मेहता, संजय नेम्मानिवार, भुमन्‍ना सावकार, चेतन पांड्या, बाळकृष्ण कदम, राजेंद्र भातनासे यांनी पोर्णिमा एजन्सी किनवट यांच्या सौजन्याने भेट वस्तू देण्यात आले.
या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. धुमाळे, पत्रकार गोकुळ भवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष गुंटापेल्लीवार,
श्रीकांत माने, परविक्षीका सुनंदा कांबळे, परिचारीका नागभिडेे, वाढे, मडावी, चव्हाण, तायडे, वडमारे, पेन्दोर, होळवे, सोनाळे, इंगळे, प्रियंका जोंधळे ह्याची उपस्थित होती. या प्रसंगी बाळकृष्ण कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार डॉ. धुमाळे यांनी मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply