kinwat today news

सर्प मित्र अमोल शिरुरकरांची वन्यजीव वाचवण्यासाठी धडपड

हाळी हंडारगुळी: (लक्ष्मीकांत मोरे)
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. लाँकडाऊन परीस्थीती सगळीकडे आहे . मात्र वन्यजीव वाचवण्यासाठी सर्प मित्र अमोल शिरूरकर सतत धडपड करीत आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी, तसेच सर्पमित्र सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता सतत रात्री अपरात्री वन्यजीवासाठी वाचवण्याच मोफत वन्यजीव काम करत आहेत.
सर्पमित्र अमोल शिरूरकर गेल्या 9 वर्षा पासून वन्यजीव वाचवण्याच काम करत आहे. अहमदपूर चाकूर जळकोट या तिन्ही तालुक्यात त्यांनी व सर्पमित्र शिरूरकर ग्रुप स्थास्पित करून दिवस रात्र साप व जखमी पशु प्राणी व इतर वन्यजीव वाचण्याचं काम करतो आहे. वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुप काम करतो आता पर्यंत ग्रुप ने दहा हजाराच्या वर साप व तसेच हरीण, मोर ,घोरपड,मुंगूस, इत्यादी वन्यजीवाना जीवनदान दिले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत
त्या मुळे सापाचा वावर खूप प्रमाणात वाढतो. साप हा निसर्गातील अन्न साकळीचा महत्वाचा घटक आहे. आणि लोकांच्या मनात या बद्दल खूप गैरसमज आहेत त्या मुळे साप मारले जातात.आपल्या परिसरात विषारी साप प्रामुख्याने 4 जातीचे आढळतात. त्यात नाग,मण्यार,घोणस,फुरसे व बिनविषारी धामण,गवत्या, दिवड,अजगर, कुकरी,डुरक्याघोणस,धुळणगीन,तस्कर, मांडूळ,कवड्या, इत्यादी.
मारण्यापेक्षा तारण्यात खरा आनंद या विचाराला सत्यात उतरविनायचा प्रयत्न ग्रुप च्या वतीने करत आहे अमोल सोबत सर्पमित्रा चे काम गोरख खेडकर,सूरज कापडे, शिवा हाके,अस्लम शेख ,या सर्व सदस्यांच्या मदतीने वन्यजीव वाचवण्याचे काम चालू आहे.या परिसरातील जखमी वन्यजीव पशु प्राणी आढळल्यास न मारता त्वरित आमच्या ग्रुप च्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा ७७०९७७९७९८ असे आवाहन ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply