kinwat today news

नगर परिषद गाळेधारकांना तीन महिण्याचे भाडेमाफी द्या – फेरोज तंवर

किनवट टुडे न्युज।।। (दि १३मे) सरकारने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लागु केलेल्या लॉकडाउन मध्ये सक्रीय सहभाग नोंदवुन लॉकडाउन पाळण्यात सहकार्य केल्या बद्दल व होत असलेले आर्थिक नुकसान सहन करणा-या नगर परिषद गाळाधारकांचे तिन महिण्याचे भाडे नगर परिषदेने माफ करावे अशा आशयाचे निवेदन भाजपा चे माजी शहराध्यक्ष फेरोझ बाबु तंवर यांनी दिले आहे.
      नागरीकांनी लॉकडाउन पाळला व पाळत आहे यामुळे प्रत्येकाला नुकसान सहन करावे लागत आहे यात किनवट शहरात नगर परिषदेचे जवळपास २०० गाळे आहे यात लहान मोठे व्यवसाय करणा-या व्यवसायिकांचे दुकाने आहेत तर या दुकानदारांनी दाखवलेल्या संयमामुळे लॉकडाउन यशस्वी होत आहे यामुळे लॉकडाउन काळातील त्यांचे भाडे नगर परिषदेने माफ करावे अशा असे निवेदन फेरोज तंवर यांनी दिले आहे, किनवट नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना दिलेल्या निवेदनात भाडेमाफी करीता फेरोझ तंवर यांनी विनंती केली आहे आता या प्रकरणी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व नगर परिषद प्रशासन कोणती भुमिका घेते ? यात कोणत्या तांत्रिक बाबी ची अडचन येते हा अभ्यास करण्याचा विषय असुन यावर सर्वानुमते सर्वकशचर्चा करुन तोडगा काढण्यात आल्यास किनवट शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे तर फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात नगर परिषद कडुन गाळेधारकांना मदत होणार आहे तर या संबधी फेरोज तंवर यांच्या मातोश्री ह्या नगर सेविका असल्याने त्यांनी यावेळी सांगितले कि या भाडेमाफी करीता नगर परिषदेत ठराव मांडुन भाडे माफी देता येते का ? या बाबत कायदेशिर बाबीचां अभ्यास चालु असुन ते शक्य असल्या तसा ठराव मांडुन गाळेधारकांना भाडेमाफी मिळवुन देण्याकरीता प्रयत्नकरणार असल्याचे त्यांनी सांगितले .
      तर नगर परिषदेत भाजप ची एकहाती सत्ता असुन श्रीमती तंवर या अपक्ष नगरसेविका भाजप च्या कोट्यातुन आहे तर त्यांच्या या ठरावाला भाजप, राष्ट्रवादी, कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक कसा प्रतिसाद देतात यावर किनवट शहरातील नागरीकांचे लक्ष लागुन आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply