kinwat today news

नांदेडकरांनसाठी दिलासादायक बातमी. आज एकही नविन रुग्ण नाही.

नांदेड: आज दिनांक 13 मे 2020रोजी प्राप्त अधिक माहितीनुसार
आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 103142 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 2131 रुग्णाचे swab घेण्यात आले आहे. त्यापैकी 1879 स्वाब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकूण 157 चा अहवाल प्रलंबित आहे. सदर दिलेल्या एकूण swab पैकी 63 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत
आतापर्यंत 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णावर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा केअर सेंटर येथे एक रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच रुग्ण हे मृत झाले आहेत त्
याचप्रमाणे अबचलनगर नांदेड येथील दिनांक 26 मे 2020 रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णास काल दिनांक 12 मे 2020 रोजी पूर्ण उपचारांती swab तपासणीचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथून सुट्टी देण्यात आलेली आहे .
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णाची विशेष काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
तरी जनतेने अफवा वर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठलीही ही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनते आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवताली कोरोना बाधीत व्यक्ती असल्यास आपणास सदरील ॲप्स सतर्क करण्यात मदत करते.
असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी केले आहे

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply