kinwat today news

लॉकडाउन काळातील विज बिल माफ करा – कॉग्रेसचे नेते प्रा.किशनराव किनवटकर यांची मागणी  

किनवट टुडे न्युज ।। ( दि. 14 मे)
लॉकडाउन काळातील विज बिल माफ करा अशी मागणी एका निवेदनाव्दारे कॉग्रेसचे नेते प्रा.किशनराव किनवटकर यांनी केली आहे.
 
     राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत यामुळे शासकीय कर्मचारी वगळता राज्यातील शेतकरी, शेतमजुर, मजुर, घरकामगार, किरकोळ व्यापारी, रिक्षावाले, ड्रायव्हर, भाजीपाला विक्रेते ह्या सर्वांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे त्यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी येत आहे तर अनेकांची हाता तोंडाची गाठ मुश्किलिने पडते अशा ह्या आर्थिक आणीबाणीच्या काळात विज बिल माफ झाले तरी ह्या भागातील सामान्य जनतेला फार मोठा दिलासा मिळेल त्यामुळे मायबाप सरकारने सर्वोच्च प्राधान्य देउन संपुर्ण राज्यातील विजबिल माफ करावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
लॉकडाउन पाळायचे शासनाने बंधनकारक केले आहे तर लॉकडाउन पाळण्या करीता नागरीकांना ९९ % घरात होम कोरनटाईन रहावे लागत आहे यामुळे घरातील टेम्पप्रेचर वाढत आहे त्या वाढत्या वातावरणाला थंड करण्या करीता व नागरीकांना विरंगुळा म्हणून वेळ घालवण्या करीता घरातील विविध उपकरणे चालु ठेवावे लागत आहे यामुळे नागरीकांना येणारे नियमित विजबिल व लॉकडाउन काळातील विजबिल हे भिन्न राहु शकते यामुळे शासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत नागरीकांनी लॉकडाउन चे पालन केले त्यामुळे किमान शासनाने नागरीकांना विज बिलमाफ करुन दिलासा द्यावा असे ही त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
      केंद्र सरकार ने लॉकडाउन घोषित केल्या नंतर नागरीकांना विविध मार्गाने दिलासा देण्याचा का होईना प्रयत्न केला आहे, परंतु त्यामानाने राज्य सरकार ने कोणत्याही प्रकारे नागरीकांना सरळ सरळ लाभ पोहचवलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने नागरीकांचे लॉकडाउन काळातील विज बिल माफ करुन त्यांना दिलासा द्यावा यात घरगुती ग्राहक, मध्यम व लघु उद्योजक व व्यवसायीक ग्राहकांचा सामावेश करावा जेणे करुन राज्यातील जास्तीत जास्त नागरीकांना या विज बिल माफीचा लाभ होईल.
            राज्यात व देशात घोषित करण्यात आलेले लॉकडाउन हे नियोजना अभावी गोर गरीबांच्या जिवावर उठलेले आहे गोर गरीबांचे जे हाल या लॉकडाउन मुळे होत आहे ते नागरीकांना आता सहन होतांना दिसत नाही यामुळे नागरीक दबक्या आवाजात लॉकडाउनचा विरोध करतांना निदर्शनास येत आहे. राज्यातील काही भागात व काही जिल्ह्यात तेथिल जिल्हाधिका-यांनी लॉकडाउन मध्ये शिथिलता दिल्याने नांदेड जिल्ह्यात ही तशा प्रकारची शिथिलता देण्याची मागणी जिल्ह्यातील लहान व्यवसायिकां कडुन करण्यात येत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply