kinwat today news

आज 12 मे रोजी सायंकाळी 9 पर्यंत 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. एकुण रुग्ण संख्या 63 वर

नांदेड: मंगळवार सकाळी बारड येथे एक रुग्ण सापडल्यानंतर त्याच दिवशी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 15 throt swab नुसार 1 अहवाल निगेटिव्ह तर 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच 4 अहवाल अनिर्णित असल्याचे कळविले आहे.
पॉझिटिव्ह प्राप्त अहवालानुसार 6 महिला रुग्णाचे वय 55 65 69 48 35 आणि 7 वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे .तर चार पुरुष रूग्णाचे वय 55, 60, 53 व 25 आहे .यातील 2 व्यक्ती फरीदाबाद हरियाणा एक दिल्ली मनसा पंजाब येथील असून उर्वरित नांदेड येथील आहेत. सर्व रुग्णावर यात्रीनिवास कोविड सेंटर येथे चालू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे .सदर प्राप्त 10 पॉझिटिव्ह अहवालामुळे शहरातील कोरोना बधितांची संख्या 63 वर पोहोचली आहे तरी जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply