kinwat today news

शिवाजी दादा गोरड यांची महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका अध्‍यक्षपदी निवड

माळशिरस : महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख राजू दादासाहेब झंजे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र यशवंत सेनेचे सोलापुर जिल्‍हा उपाध्‍यक्ष मा.श्री. आकाश होनमाने यांच्‍या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्‍यक्ष पदी मा.श्री.शिवाजी दादा गोरड (माळशिरस गोरडवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली.
सदरील नियुक्ती पुढील एक वर्षाच्या कालावधी साठी करण्यात आली आहे. त्यांच्या एक वर्षाचा कार्य अहवाल पाहून पदाचा कालावधी वाढवण्या संदर्भात पदसमिती योग्य तो निर्णय घेईल . समाज हिताचीच कामे करण्यासाठी व पदाचा कुठल्याही प्रकारे दुरपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निवडीच्या पत्रात नमुद केले आहे. यावेळी गोरडवाडी गावचे सरपंच नामदेव गोरड मनसेचे अकलुज शहर अध्‍यक्ष सुदाम आवारे. समाजसेवक रफीक सय्यद. अमोल गोरड. सोमनाथ हुलगे.दादा कोळेकर. नामदेव गोरड. बजिरंग शिंगाडे. आण्णा गोरड. तानाजी गोरड. सदाशिव गोरड. बाळु गोरड उपस्‍थित होते

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply