kinwat today news

दि.12 मे रोजी बारड येथील एक रुग्णाचा swab तपासणी अहवाल पॉझिटिव एकूण पॉझिटिव्ह संख्या 53 वर.

नांदेड: आज दिनांक 12 मे 2020 रोजी मिळालेल्या माहितीनुसार बारड येथील एका रुग्णाचा स्वाब तपासणी अहवाल पॉझिटिव आल्याचे डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
यानुसार आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 100698 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकूण 2002 रुग्णाचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1730 स्लॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून188 अहवाल प्रलंबित आहे.सादर घेतलेल्या एकूण स्वब पैकी 53 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आज प्राप्त एकूण 24 अहवालानुसार ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा covid- सेंटर तालुका मुदखेड येथील एक रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच 23 अहवाल हे निगेटिव प्राप्त झाले आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.
असे एकूण 53 पॉझिटिव रुग्णांपैकी 12 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णावर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा केअर सेंटर येथे एका रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे तसेच पॉझिटिव रुग्ण पैकी 5 रुग्णही मृत झाले आहेत.
औषधउपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 5 रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रूग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच प्रशासनास सहकार्य करावे व सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपणास आपल्या सभोवती बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील सतर्क करण्यास मदत करते असे आव्हान डॉक्टर नीळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा नांदेड यांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार बारड येथे सापडलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मुंबई येथून आला होता.

मुंबई येथून बारडला परतलेल्या एका कुटुंबातील २२ वर्षाच्या तरुणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.हे कुटुंब बारडकडे येण्यासाठी मुंबईहुन पायी निघाले होते. त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता.मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्व जण दोन दिवसांपूर्वी बारडला पोहचले होते.यानंतर त्यांना क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यामध्ये एक जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या बारडमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान मुंबई येथून निघताना यांची कुठेही तपासणी झाली नाही असेच दिसून येते.हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply