kinwat today news

बारड येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद बने यांची महाराष्ट्र यशवंत सेनेच्यां मुदखेड तालुका प्रमूख पदी निवड

बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बारड येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद बने यांची महाराष्ट्र यशवंत सेनेच्यां मुदखेड तालुका प्रमूख पदी निवड करण्यात आली आहे.
गोविंद बने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र यशवंत सेनेचे आ.राजू दादासाहेब झंजे यांनी नूकतेच निवडीचे पत्र देऊन निवडी बद्दल अभिनंदन केले.
तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे सामाजिक प्रश्न मांडून ते महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवन्याचा आणि समाजातील तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार या साठी सामाजीक तळमळ व कार्यक्षम कार्यकर्ता आणि विश्वासू म्हणून गोविंद बने यांच्यावर महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू दादासाहेब झंजे यांनी तालुका प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. या निवडीचे मुदखेड तालुक्यातून सर्वत्र अभिनंदनाचे वर्षाव होत असून त्यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply