kinwat today news

निधी नसल्याने घरकुल बांधकाम अपूर्ण; लाभार्थी उघड्यावर

हाळी हंडरगुळी: (-लक्ष्मीकांत मोरे )
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील घरकुल योजनेचे बिल थांबल्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम थांबवावे लागले उसनवारी करुन बांधकाम करावे लागले. बांधकाम लवकर करता येईल म्हणुन मिळेल तेथे घर बनवुन राहीले पण कोरोनाचा जगातील थैमान त्यामुळे प्रादुर्भाव वाढू नेय यासाठी प्रशासन लाँकडाऊन टप्पा वाढवत आहेत प्रशासनाकडून प्रयत्न काळजी पुर्वक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करत आहेत.त्यामुळे घरकुल योजनेचे बिल थांबले आहे.
सामान्य कुटूंबातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी दिली जाते. हाळी व हंडरगुळी या दोन्ही ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावानुसार २०१९ – २० वर्षासाठी पंचायत समितीने मंजुरी दिली. मात्र घरकुल हप्ता राबवल्याने घरकुल अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
       ग्रामीण भागात अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना रमाई तर खुल्या प्रवर्गातील, आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतील घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपये तर मजुरासाठी १८ हजार असे १ लाख ३८ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्याने बांधकामानुसार जमा केले जातात. मात्र हाळी हंडरगुळी गावात नव्याने मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी पहिला व दुसरा हप्ता मे-जून महिन्यात जमा होताच लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली. बांधकाम करण्यासाठी खर्च येतो तो उसनवारी करुन बांधकामास सुरुवात केली.मात्र पुढील हप्ता पाच, सहा महिन्यांपासून थांबल्याने घरांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.शेजारी किंवा साधे घर करुन राहण्याची वेळ आली आहे.
      सुरूवातीला निधी मिळाल्याने लाभार्थ्यांनी जुनी घरे पाडून नवीन घरांचे बांधकाम सुरू केले.त्यातच कोरोनाचा संसर्ग दिवसेदिवस वाढतच आहे त्यामुळे लाँकडाऊन टप्पा प्रशासनास वाढवावा लागत आहे . घरकुलाचे  मात्र पैसै अपुरे पडत असल्याने उसनवारी केली. बांधकाम साहित्य उधारीवर आणले. जवळ असलेले पैसे काम करणा-या मजुरासाठी खर्च झाले. उधार आणलेल्या साहित्याच्या पैशासाठी दुकानदार तगादा लावत आहेत. एकीकडे अर्धवट घर तर दुसरीकडे उघड्यावर राहण्याची वेळ यामुळे लाभार्थी मेटकुळीला आहे आहेत. दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीला विचारणा केली असता मार्च एन्ड नंतर सध्या विचारले असता कोरोना मुळे निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी लाभार्थ्याकडून होत आहे.
                               

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply