कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ; जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला ऑनलाईन संवाद

नांदेड, (जिमाका) दि. 11 :- कोरोना प्रतिबंधात्मक संदर्भात विविध उपाययोजना नांदेड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सोमवार 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वा. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून प्रथमच ऑनलाईन संवाद साधून त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

कोरोना प्रतिबंध संदर्भात केलेल्या उपाययोजना आणि एकूणच पत्रकारांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून यावेळी केले. प्रथमच जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांसोबत आणि पत्रकारांनीही प्रथमच जिल्हाधिकारी यांच्या सोबत ऑनलाईन हा संवाद साधला. त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे उपस्थित होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील एकूण 72 पत्रकारांनी ऑनलाइन संवादाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

2 thoughts on “कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ; जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला ऑनलाईन संवाद

 1. Greetings from Idaho! I’m bored to death at work so I decided to browse your blog on my iphone during lunch break.
  I really like the info you provide here and can’t
  wait to take a look when I get home. I’m amazed at how fast your blog loaded
  on my phone .. I’m not even using WIFI, just 3G ..
  Anyways, excellent site!

Comments are closed.