kinwat today news

एन.आर.आय.यात्री निवास केअर सेंटर येथील आणखी एक रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे)रा.दिल्ली पॉझिटिव्ह.

नांदेड: (11मे ) आज दिनांक 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करोना विषाणू संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 98690 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकूण 1828 रुग्णाचे स्वाब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1702swab तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 38 चा अहवाल प्रलंबित आहे. सदर घेतलेल्या एकूण swab पैकी 52 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आता प्राप्त येथून 115 अहवालानुसार एन आर आय यात्री निवास सेंटर येथील एक रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे)रा. दिल्ली हा पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. तसेच 113 अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.
असे एकूण 52 पॉझिटिव रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णावर आणी माहूर कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच रुग्ण हे मृत झाले आहेत.
औषधोपचारात प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रूग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णाची विशेष काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे .
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे.
तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती करूना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील सतर्क करण्यास मदत करते अशी माहिती डॉक्टर निळकंठ ईश्वराव भोसिकर जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय नांदेड यांनी कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply