kinwat today news

शेतकऱ्यांच्या ३५ हजार क्विंटल मका तातडीने खरेदी करा

किनवट टुडे न्युज।। : रब्बी हंगामात किनवट तालुक्यातील शेतकऱ्याकडून पिकविण्यात आलेला 35 हजार क्विंटल मका पडून असून राज्यसरकारने महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन कडून आणि केंद्र सरकारने एफसीआय किंवा नाफेड कडून मका तातडीने खरेदी करावा,आणि किनवट येथील मका खरेदी केंद्र सुरू करावे यामागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी खरेदी बंद असलेले खरेदी केंद्र सुरू करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.लवकरच राज्यसरकारकडून याबाबतचा अहवाल केंद्राकडे राज्याकडून पाठविला जाणार आहे.
हिंगोली मतदार संघातील किनवट तालुक्यातील इस्लापुर,कोसमेट,भिसी,शिवणी,तल्हारी, व अप्पारावपेठ या आदिवासी भागात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात मका लावण्या संदर्भात शेतकऱ्यांना आग्रही केले.कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणे पुरविले.मक्याचे पिकांचे उत्पादन घेतले. ऐन पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आतोनात नुकसान झाले,यामुळे हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय खरेदी सुद्धा बंद करण्यात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व बाजारपेठ बंद झाल्या,पिकवलेला ३५ हजार क्विंटल
मका शेतकाऱ्यांकडे पडून आहे .बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या भागात मका खरेदी केंद्र सुरू करावे व महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन ,एफसीआय किंवा नाफेड कडून तातडीने खरेदी करावा,यामागणीचा पाठपुरावा खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान,अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून केला आहे. यापूर्वी सुद्धा नांदेड जिल्हा खरीप पूर्व हंगाम बैठकीत ही मागणी खासदार हेमंत पाटील यांनी भक्कमपणे मांडली होती.
खासदार हेमंत पाटील यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देखील शेतकरी हित जोपासले आहे.लॉकडाऊन काळात शेत मालाला मुभा देण्यासाठी प्रशासनास मागणी केली होती तर वसमत येथे हळद खरेदी सूरु करून, इसापूर धरणाचे पाणी मे महिन्यात दोन टप्यात सोडण्यात यावी अशीही मागणी केली आहे. तसेच मागील हंगामातील पीकविमा मंजूर करण्याबाबत ते सतत पाठपुरावा करत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply