kinwat today news

खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला; किनवट येथील कापूस खरेदी केंद्राची सुरवात

किनवट टुडे न्युज।। : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील बऱ्याच दिवसापासून किनवट (चिखलीफाटा) येथील कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते .खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने हे कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाले आहे.या प्रसंगी आमदार भीमराव केराम उपस्थित होते. तब्बल 3 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 20 हजार क्विंटल च्या वर कापसाची आवक होणार आहे.शेतकऱ्यांना दिलेले वाचन पूर्ण करण्यात आले आहे.
कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या सर्व राज्यभरात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी पण बंद करण्यात आली होती. त्याचा फटका शेतकऱ्याच्या रब्बी मधील पिकाला बसला आहे .शेकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कापूस घरात पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
किनवट आणि माहूर भागातील तब्बल 20 हजार क्विंटलच्या आसपास कापूस शिल्लक आहे.याबाबत शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली होती. यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सीसीआय चे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली मधील 5 नांदेड मधील किनवट ,माहूर, हदगाव,हिमायतनगर तर यवतमाळ मधील उमरखेड, महागाव या एकूण 11 तालुक्यांचा समावेश होत असल्याने या सर्वच ठिकाणी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली होती.त्यांनतर त्यांनी केंद्र व राज्यस्तरावर मुख्यमंत्र्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केल्याने सीसीआय कापूस खरेदी केंद्रांना सुरवात होत आहे.मागील आठवड्यात वसमत तालुक्यातील जवळाबाजार कृ. उ.बा.अंतर्गत मार्डी येथे सीसीआय च्या कापूस खरेदी केंद्राची सुरवात करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि आता किनवट/माहूर भागातील केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply