kinwat today news

कन्टेनमेंट झोन मध्ये काटेकोरपणे नियम पाळल्यास लवकर बंदी उठवण्यात येईल – जिल्हाधिकारी विपीन इटनकर

नांदेड दि. 10
अबचलनगर कन्टेनमेंट झोन मधील नागरिकांनी प्रशासनाचे दिशानिर्देश तंतोतंत पाळल्यास आणि पॉजिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ न झाल्यास लवकरच कन्टेनमेंट झोन उठवण्यात येईल. पण नागरिकांचे असहकार्य लाभल्यास नाइलाजाने कालावधी दिशानिर्देशानुसार अमलात ठेवाव्या लागतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवार दि. 10 मे रोजी अबचलनगर कमानीजवळ नागरिकांशी चर्चा करतांना सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजीतपाल सिंघ संधू, सह आयुक्त अंधारे, सह आयुक्त प्रकाश गच्चे, अधीक्षक घनश्याम परडे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अबचलनगर झोनचा आढावा घेता वेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित प्रतिनिधींशी समस्यांवर चर्चा केली. यात गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविंदरसिंघ बुंगाई, बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, व्यवस्थापन समिति सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, नगर सेवक संदीपसिंघ गाड़ीवाले, माजी उपमहापौर सरजीतसिंघ गिल, पत्रकार रविंदरसिंघ मोदी, महेंद्रसिंघ लांगरी, अमरजीतसिंघ महाजन यांनी विविध विषय निदर्शनास आणून दिले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, अबचलनगर मधील काही रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले पुढे एका रुग्णाची मृत्यूमुळे नियमानुसार 28 दिवसासाठी कन्टेनमेंट झोन येथे अमलात आणले गेले. यानंतर येथे राहणाऱ्या सर्व कुटुम्बियांची सुरक्षा हा प्रथम ध्येय आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा आंगण परिसरात गोळा होऊन बसू नयेत. पण येथील नागरिक विशेष म्हणून युवक मंडळी नियमाविरुद्ध जाऊन घोळक्यात फिरत असल्याच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. मॉर्निंग वॉक आणि इवनिंग वॉक चा प्रकार योग्य नव्हे. यामुळे वायरसचा प्रसार होऊ शकतो. आणि कॉलोनी असल्यामुळे मुळे त्याचे गंभीर परिणाम पुढे येऊ शकते. म्हणून स्वतः च्या आणि इतरांची सुरक्षा कशी अबाधित राहिल याचा विचार झाला पाहिजे.

जिल्हाधिकारी यांनी कोरोना संक्रमित रुग्णांना चांगले जेवण आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाणे यांनी नागरिकांना कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी समुपदेश केला. जीवनावश्यक वस्तुंचे एकाच वेळी संग्रहण करण्याचे तसेच मधुमेह आणि ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी औषधि आणि गोळ्या मागवून ठेवाव्यात असे आवाहन केले.

पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर यांनी सांगितले की अबचलनगर कन्टेनमेंट झोन वर ड्रोन द्वारे निगा ठेवण्यात येईल. नियमांचे उल्लंघन कारणाऱ्यांवर पुढे कड़क करवाई करण्यात येईल असे ही ते म्हणाले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply