kinwat today news

एन.आर.आय.यात्री निवास कोविंड केअर सेंटर येथील 6 रुग्ण हे पॉझिटिव्ह;एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 51

नांदेड: आज दिनांक 10 मे 2020 रोजी सायंकाळी चार वाजता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 96147 व्यक्तीची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 1690 रुग्णाचे swab घेण्यात आले आहेत.
यापैकी1571 swab तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. एकूण 37 रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.
सदर घेतलेल्या एकूण swab पैकी 51 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता प्राप्त एकूण 89 अहवालानुसार एन. आर. आय. यात्री निवास कोविंड केअर सेंटर येथील 6 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच 82 अहवाल हे निगेटिव प्राप्त झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.
असे एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 32 रुग्णावर आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे एक रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्ण मृत झाले आहेत.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण रक्तदान मधुमेह या आजाराने बाधित होते.त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णाची विशेष काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे
तरी जनतेने आफवावर विश्वास ठेवू नये. तसेच कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. तसेच प्रशासनास मदत करावी असे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply