kinwat today news

फक्त वैद्यकीय सेवा वगळून आज किनवट संपूर्णतःलॉक डाऊन.

किनवट टुडे न्युज।। (10 मे)
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 10 मे रोजी वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्वच लॉक डॉऊन चे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक, व्यापाऱ्यांनी व लोकांनी हा लॉक डाउन यशस्वी करावे असे आव्हान नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी केले आहे.
राज्यासह नांदेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.याच मतदारसंघातील माहूर येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
किनवट शहरालगत तेलंगणा व विदर्भाची सीमा आहेत.तेलंगणाच्या आदिलाबाद व विदर्भाच्या यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
नांदेड शहरात रुग्णाची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी(दि.10)रोजी संपूर्ण दिवसासाठी फक्त वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून व्यापारी व नागरिकानी प्रशासनाला सहकार्य केले होते.
आता लॉक डाउन च्या तिसऱ्या टप्प्यातही बंद यशस्वी करावा. नागरिकांनीही एक दिवस घराबाहेर पडू नये अशा आवाहन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply